Holi 2025 IRCTC Tatkal Ticket Booking Tips : सणासुदीच्या काळात बरेच लोक आयत्यावेळी कुठेतरी फिरायला जाण्याचा किंवा गावी जाण्याचा प्लॅन करतात. यात आता होळीचा सण येतोय, यानिमित्तानेही अनेक जण आपल्या गावी जाण्याचा प्लॅन आखतात. अशावेळी ते प्रवासासाठी ट्रेनचे तात्काळ बुकिंग करतात. पण, तात्काळमध्ये काढलेले तिकीट कन्फर्म होणे इतके सोपे नसते, त्यामुळे आम्ही तुम्हाला अशा काही पाच टिप्स सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्हाला तात्काळमधून कन्फर्म तिकीट मिळवू शकता.
त्काळमधून कन्फर्म तिकीट मिळवण्यासाठी फॉलो करा ‘या’ टिप्स
१) पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तात्काळ तिकीट बुकिंग करताना आधी तुमचे इंटरनेट कनेक्शन तपासा, कारण तात्काळ तिकीट बुकिंगवेळी काही मिनिटांचा अवधी असतो, ज्यात तुम्हाला तिकीट कन्फर्म मिळण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्ही जर मोबाइल किंवा कॉम्प्युटरवरून तिकीट बुक करणार असाल तर त्याचे इंटरनेट कनेक्शन फास्ट हवे.
२) तात्काळमधून कन्फर्म तिकीट मिळवण्यासाठी योग्य वेळी लॉग इन करा, बुकिंग सुरू होण्यापूर्वी २ ते ३ मिनिटं आधीच लॉग इन केल्यास फायदेशीर ठरेल. एसी क्लासचे बुकिंग सकाळी दहा वाजता सुरू होते, तर नॉन एसी डब्यांसाठी तात्काळ तिकीट बुकिंग ११ वाजल्यापासून सुरू होते, त्यामुळे या वेळा बघूनच तात्काळ तिकीट बुकिंग करा.
३) प्रवासी मास्टर लिस्ट वापरू शकतात, ज्यामुळे त्यांना बुकिंग प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच प्रवाशांची सर्व माहिती भरता येते.
४) क्रेडिट आणि डेबिट कार्डच्या तुलनेत यूपीआयचा वापर करून तुम्ही पेमेंट करू शकता, ज्यामुळे तुमचा वेळही वाचतो.
५) उतरण्याचे स्थानक सूज्ञपणे निवडल्यास कन्फर्म तिकीट मिळण्याची शक्यता वाढते. या टिप्सच्या मदतीने तुम्ही कन्फर्म तिकीट मिळवू शकता.