ौैIRCTC Tour Package : इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन म्हणजेच IRCTC पर्यटन स्थळे तसेच धार्मिक स्थळांसाठी उत्तम टूर पॅकेज ऑफर करत असते. आता IRCTCने भारत गौरव टुरिस्ट ट्रेन द्वारे पुरी-गंगासागर प्रवास करण्याची संधी दिली आहे. तुम्हाला भारतातील सुंदर ठिकाणांना भेट द्यायची असेल तर तुम्ही हा दौरा चुकवू नका. या दोऱ्याचे भाडेही फार जास्त नाही. पॅकेज खरेदी केल्यानंतर, सर्व जबाबदारी आयआरसीटीसीचे असेल, कारण तुमची जेवण आणि राहण्याची व्यवस्था देखील आयआरसीटीसीच करणार आहे.
कोणत्या ठिकाणांना दिली जाणार भेट
या टूर पॅकेजतंर्गत पुरी येथील जगन्नाथ मंदिर आणि कोणार्क येथील सुर्यमंदीर, गंगासागर तीर्थ, कोलकात्तामधील काली माता मंदीर, बैद्यनाथमधील बैद्यानाथधाम ज्योर्तिलिंग, गया येथी महाबोधी मंदिर आणि विष्णूपद मंदिर, वाराणसी येथील काशी विश्वनाथ मंदिर आणि गंगा घाट आणि अयोध्येतील श्री रामजन्म भूमी या या ठिकाणांना भेट देऊ शकता. भारत गौरव टुरिस्ट ट्रेन १६ मे २०२३ला इंदौरमधून निघणार आहे.
प्रति व्यक्ती फक्त १७,६०० रुपये येईल खर्च
या पॅकेजमध्ये प्रति व्यक्ती १७६०० रुपये खर्च करावे लागणार आहे. तसेच या टूर पॅकेजतंर्गत प्रवासी ९ रात्र आणि १० दिवसांची दौरा करणार आहे. या स्पेशल ट्रेनमध्ये प्रवासी इंदौर, उज्जेन, राणी कमालापति, इटारसी, जबलपूर आणि कटनी या स्टेशनवरुन चढू किंवा उतरू शकतात. या पॅकेजमध्ये तुम्हाला तुमच्या खाण्या-पिण्याची चिंता करण्याची आवश्यकता नाही.
टूर पॅकेजमधील विशेष गोष्टी
पॅकेजचे नाव – पुरी गंगासागर भव्य काशी यात्रा (WZBGI01)
भेट दिली जाणारी ठिकाणे- जगन्नाथ पुरी, गंगासागर, बैद्यनाथ, वाराणसी और अयोध्या
तिकी दिवसांचा असेल दौरा– ९ रात्री और १० दिवस
दौरा सुरू होण्याची तारीख – १६ मे २०२३
बोर्डिंग/डिबोर्डिंग पॉइंट- इंदौर, उज्जैन, रानी कमलापति, इटारसी, जबलपुर आणि कटनी
जेवण – नाश्ता, दुपारचे आणि रात्रीचे जेवण