IRCTC Mata Vaishno Devi Tour Package : IRCTC ने माता वैष्णोदेवीच्या भक्तांसाठी एक अप्रतिम टूर पॅकेज जाहीर केले आहे. धार्मिक ठिकाणी भेट देऊ इच्छिणाऱ्या प्रवाशांसाठी ही एक चांगली संधी आहे, ज्यामध्ये माता वैष्णो देवीच्या दर्शनासोबतच प्रवासी हरिद्वार आणि ऋषिकेशलाही भेट देऊ शकतील.

10 जून रोजी सिकंदराबाद रेल्वे स्थानकावरून खास ट्रेन धावणार

इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन म्हणजेच IRCTC ने ‘माता वैष्णो देवी विथ हरिद्वार ऋषिकेश’नावाचे टूर पॅकेज सुरु केले आहे, ही टूर ८ रात्री आणि ९ दिवसांची आहे. पुढील महिन्यात १० जून रोजी सिकंदराबाद रेल्वे स्थानकावरून भारत गौरव पर्यटक ट्रेन प्रवाशांसह सुटेल.

transgender stealing gold worth rs 2. 4 lakh from home who came for ganpati darshan in kalyan
कल्याणमध्ये गणपती दर्शनासाठी घरात येऊन तृतीयपंथीय टोळीकडून सोन्याच्या ऐवजाची चोरी
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Paper Pulp Ganesha Idols
कागदाच्या लगद्यापासून गणेशमूर्ती! वजनदार मूर्तींना पर्याय; गिरगावातील सार्वजनिक मंडळांचा पर्यावरणपूरक उत्सवासाठी पुढाकार
Gosht Mumbaichi
गोष्ट मुंबईची! भाग १५३ : इन्फोसिसच्या नावाची चर्चाही झाली याच गणपतीच्या साक्षीनं!
Ganpati rangoli
मुलुंडमध्ये पस्तीस किलो साबुदाण्यापासून गणपतीची रांगोळी
CNG, CNG expensive pune, CNG Pimpri,
ऐन गणेशोत्सवात सीएनजी महागला! पुणे, पिंपरीतील बदललेले दर जाणून घ्या …
ganesh pran pratishtha muhurat between 4.40 AM to 1.51 PM
गणरायाच्या प्रतिष्ठापनेसाठी दुपारी पावणेदोनपर्यंत मुहूर्त, गणेशोत्सवाच्या आनंदपर्वाचा शनिवारपासून श्रीगणेशा
Mumbai, Bridge , Ganesh utsav,
मुंबई : गणेशोत्सवात १३ धोकादायक पुलांचे विघ्न, आगमन-विसर्जन मिरवणुकीच्या वेळी काळजी घेण्याचे आवाहन

हेही वाचा- IRCTCने लेह आणि लडाख फिरण्यासाठी आणले जबरदस्त टूर पॅकेज, कमी खर्चात मित्रांसोबत काढा ट्रिप

प्रवाशांना या स्थानकांवर चढता-उतराता येईल

या टूरमध्ये सिकंदराबाद, काझीपेठ, पेड्डापल्ली, रामागुंडम, सिरपूर कागजनगर, बल्हारशाह, वर्धा आणि नागपूर रेल्वे स्थानकांवर प्रवाशांसाठी चढता-उतरता येईल, जेथून प्रवासी प्रवास सुरू करू शकतात आणि समाप्त करू शकतात. या दौऱ्यासाठी पॅकेजची किंमत रु. १५४३५/- प्रति व्यक्ती निश्चित करण्यात आली आहे.

ट्रेनमध्ये ७०० जागा आहेत, तुमची सीट लवकर आरक्षित करा

IRCTCने दिलेल्या माहितीनुसार, या टूरमध्ये आग्रा, मथुरा, वृंदावन, कटरा, हरिद्वार आणि ऋषिकेश यांचा समावेश आहे, प्रवाशांना स्लीपर क्लास, २AC आणि ३AC क्लासमध्ये प्रवास करता येईल आणि त्यानुसार त्यांचे भाडे आकारले जाईल. ट्रेनमध्ये एकूण ७०० जागा असतील, त्यापैकी ४६० जागा स्लीपर क्लासमध्ये, ३AC मध्ये १९३ आणि २AC मध्ये ४८ जागा असतील, तुम्ही तुमच्या सोयीनुसार आतापासून तुमची सीट आरक्षित करू शकता.

हेही वाचा – IRCTC ने आणले भन्नाट टूर पॅकेज! उन्हाळ्यात शिमला-कुल्लू-मनाली फिरण्याची संधी

ही प्रसिद्ध ठिकाणे पाहण्याची संधी मिळेल

आग्रा ताजमहाल.
मथुरा : कृष्णजन्मभूमी.
वृंदावन: प्रेम मंदिर, बांके बिहारी मंदिर.
कटरा: माता वैष्णो देवी मंदिर.
हरिद्वार: मनसा देवी, हर की पौरी.
ऋषिकेश-लक्ष्मण झुला, राम झुला.