उन्हाळा सुरू झाला आहे. यंदाच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये जर तुम्ही बर्फाळ पर्वतरांगामध्ये फिरण्याचा प्लॅन करत असताल तर काश्मिरची राजधानी असलेल्या श्रीनगर फिरु शकता. श्रीनगर भारतातील काही सर्वात सुंदर शहरांपैकी एक आहे. रात्रीच्या वेळी येथे दल लेकचे दृश्य कोणत्याही काल्पनिक कथेसारखे भासते. जर तुम्ही देखील श्रीनगरमध्ये फिरण्याचा प्लॅन करत असाल तर IRCTC तुमच्यासाठी खूप चांगला पॅकेज घेऊन आले आहे.या टूर पॅकेजमार्फत खूप कमी वेळामध्ये श्रीनगर टूर करू शकता. या टूर पॅकेजचे नाव जन्नत ए काश्मिर म्हटले जाते. चला जाणून घेऊ या, टूर पॅकेजबाबत पूर्ण माहिती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पहिल्या आणि दुसऱ्या दिवसाचा 1 टूर प्लॅन

या टूर पॅकेजची सुरूवात इंदौर एअरपोर्टमार्फत होणार आहे. इंदौरमधून उड्डान करुन विमान श्रीनगरमध्ये उतरणार आहे. टूर च्या दुसऱ्या दिवशी ब्रेकफास्ट करून पर्यटक श्रीनगरपासून सोनमर्गसाठी जाऊ शकता. सोनमर्गला सोन्याच्या गवताचे मैदान म्हणून ओळखले जाते. हे समुद्र सपाटीपासून २८०० मीटर उंचीवर स्थि आहे. सिंध नदी येथून जाते आणि येथे ट्राऊट आणि महासीरच्या झाडांचे मैदान आहे. उन्हाळ्याच्या ऋतूमध्ये तम्ही थसवाज ग्लेशिअरचा दौरा करु शकता.

हेही वाचा : कमी खर्चात नेपाळ फिरायचयं? मग, IRCTC चे हे पॅकेज निवडा, तुमची इच्छा पूर्ण करा

तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या दिवसाचा टूर प्लॅन

टूरच्या तिसऱ्या दिवशी पर्यटक गुलमर्गचा दौरा करु शकतात. गुलमर्गला फुलांचे शहर म्हटले जाते. येथे जगातील सर्वात उंच केबल कारपैकी एक गुलमर्ग गोंडोला देखील आहे. तसेच पर्यचक खिलमर्गची सैर करू शकतात. टूरच्या चौथ्या दिवशी पहलगामची सैर करू शकता. पहलगाम समुद्रतळाच्या २४४० मीटर उंचीवर स्थित थंड हवेचे ठिकाण आहे. येथे कित्येक चित्रपटाच्या शूटिंग देखील झाली आहे. टूरच्या पाचव्या दिवशी नाश्ता करून श्रीनगरला परत जाणार आहे.

हेही वाचा – उन्हाळ्याच्या सुट्टीत फिरा व्हिएतनाम, लाओस आणि कंबोडिया, IRCTCने आणले जबरदस्त पॅकेज, जाणून घ्या माहिती

या मार्गात शंकराचार्य मंदिराला भेट द्या. त्यानंतर ते डल झीलच्या किनारी हजरतबलस तीर्थ स्थळाचे दर्शन करु शकता. तसेच रात्रीच्या वेळी डल लेकच्या शिकारा राईडटचा अनुभव घेऊ शकता. टूरच्या सहाव्या दिवशी श्रीनगर एअरपोर्टवरुन इंदौरला जाऊ शकता.

येथे पाहा संपूर्ण पॅकेज – https://www.irctctourism.com/pacakage_description?packageCode=WBA036

किती असेल भाडे

IRCTCने ५ रात्री आणि ६ दिवसांसाठी श्रीनगर टूर पॅकेजसाठी पर्यटकांना ४४००० रुपये भाडे द्यावे लागेल. यामध्ये सैलानियां ना इंडिगो फ्लाईटचे तिकीट ४ रात्रींसाठी हॉटेल, ब्रेकफास्ट आणि डिनरची सोय केली आहे आणि साईटसीनसाठी एसी गाड्यांची सोय केली आहे.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Irctc tour plan visit srinagar in summer vacation get a chance to travel by plane for very less money snk
Show comments