Is Angry Healthy: तो किती रागीट आहे.. यार इतकं चिडचिड करणं बरं नाही, तुमचा स्वभाव तापट आहे का? मनाविरुद्ध गोष्टी झाल्यावर तुम्ही चटकन रागावता का? मग आजवर तुम्हाला नक्कीच अनेकांनी कसं जरा ‘थंड’ घ्यायला हवं याविषयी न मागता सल्ला दला असेल. राग व्यक्त करणं या विषयाला नेहमीच नकारात्मक भावनेशी जोडून मांडले जाते पण आज आपण या सर्व समजुतींना छेद देणारी माहिती पाहणार आहोत. तुम्हाला ठाऊक आहे का तुमचा राग तुम्ही जर दाबून ठेवला तर कदाचित इतरांचा एक दिवस चांगला जाईल पण त्यामुळे आपले दीर्घकालीन नुकसान होऊ शकते.

शैक्षणिक तज्ज्ञ सारा ऐर्ड यांनी अलीकडेच आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये आरोग्यासाठी गुणकारी रागविषयी माहिती दिली आहे. शिवाय भावनांवर कसं वर्चस्व मिळवता येईल यावरही मार्गदर्शन केले आहे. चला तर जाणून घेऊयात रागामुळे तुमचा कसा फायदा होऊ शकतो.

pushpa 2 song controversy
चेंगराचेंगरीनंतर ‘पुष्पा २’बद्दल नवा वाद, निर्मात्यांना युट्युबवरून हटवावं लागलं ‘हे’ लोकप्रिय गाणं; कारण काय?
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
loksatta editorial on rupee getting weaker day by day against the dollar
अग्रलेख : बबड्या रुपया, कारटा डॉलर
Sharad Pawar
“राज्यात दहशतीचं वातावरण, कृपा करा अन्…”, शरद पवारांकडून मस्साजोगच्या ग्रामस्थांना धीर; म्हणाले, “आता आपण सगळ्यांनी…”
‘या’ अभिनेत्याची एक चूक मनोज बाजपेयी यांच्या जीवावर बेतली असती; स्वतः खुलासा करत म्हणाले, “आमची जीप एका मोठ्या…”
What Sunil Tatkare Said About Chhagan Bhujbal ?
Sunil Tatkare : “छगन भुजबळ यांच्याविषयी येवल्यात जाऊन कोण काय बोललं होतं ते…”; सुनील तटकरेंचं सुप्रिया सुळेंना उत्तर
Milind Gawali
“१२ वीमध्ये मी मराठी विषयामध्ये नापास झालो”; मिलिंद गवळी म्हणाले, “मी वर्गात जाताना…”
amdar niwas Nagpur , Amol Mitkari Grievance ,
आमदार निवासातील गरम पाण्याचे गिझर बंद; आमदार म्हणतात, “अंघोळ करायची कशी?”

भावनांवर नियंत्रण म्हणजे सदैव आनंद?

खरंतर अनेकदा मानसशास्त्र तज्ज्ञ नेहमी आनंदी राहा असा सल्ला देतात पण मानसिक आरोग्य सदृढ असणे म्हणजे तुम्ही केवळ हसत राहणे नाही तर तुम्हाला तुमचा राग, दुःख, वेदना सुद्धा तितक्याच सहज हाताळता येणं गरजेचं आहे. त्यासाठी या भावनांचा स्वीकार करता यायला हवा.

तुमचा राग लपवल्यास काय होते?

अनेकदा ऑफिसमध्ये समजुतीने वागताना राग लपवावा लागतो पण तो राग विसरता येत नाही याचा परिणाम इतर दिवशी दिसून येतो. हे टाळायचे असल्यास आपण राग व्यक्त करणे आवश्यक आहे. तुम्हाला जर त्या व्यक्तीशी बोलून राग व्यक्त करायचा नसेल तर तुम्ही लिहून, किंवा तुमच्या कल्पनाशक्तीच्या जोरावर त्या व्यक्तीच्या प्रतिकात्मक आकृतसमोर राग बोलून दाखवावा. इतरांवर राग काढण्यापेक्षा हा सर्वात सोपा मार्ग आहे.

Brain Stroke Study: ६० वर्षाखालील व्यक्तींनाही ब्रेन स्ट्रोकचा धोका; ‘या’ एका रक्तगटात आढळले सर्वाधिक रुग्ण

बहुतांश आजारांच्या मागेही लपवलेला राग कारण ठरू शकतो. जगप्रसिद्ध लेखिका लुईस हे यांनी आपल्या यु कॅन हिल युअर लाईफ या पुस्तकात याचे दाखले दिले आहेत. लहानपणीच्या संतापातून कॅन्सर सारख्या आजाराला बळी पडल्याचे त्यांनी आपल्या पुस्तकात म्हंटले होते यावर उपाय शोधताना राग मान्य करून, व्यक्त करून, सोडून देण्याची साधी प्रक्रिया त्यांनी स्विकारली होती. जेव्हा राग इतरांना त्रास न देता व्यक्त केला जातो तेव्हा तुमच्या खऱ्या समस्यांवर उत्तरही मिळू शकते.

Story img Loader