सध्याच्या धावपळीच्या युगात अयोग्य आहार आणि बिघडलेली जीवनशैली कमी वयातच लोकांना हृदयरोगी बनवत आहे. तरुण वयात हृदयविकाराच्या झटक्यांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. हृदयविकार टाळायचे असतील तर हृदयाची काळजी घेणे आवश्यक आहे. हृदयात कोणतीही समस्या आली की त्याची लक्षणे शरीरात दिसू लागतात. अचानक बेशुद्धी येणे, धाप लागणे, हृदयाचे ठोके बंद होणे, चक्कर येणे, छातीत दुखणे, मळमळ आणि उलट्या होणे ही हृदयविकाराची लक्षणे असू शकतात.

हृदयविकाराचा झटका तेव्हा येतो जेव्हा हृदय रक्त पंप करणे थांबवते. कार्डियाक अरेस्टमुळे तुम्हाला हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. फुफ्फुसातील रक्ताच्या गुठळ्या आणि हृदयाभोवती रक्तस्त्राव झाल्यामुळे कार्डियाक अरेस्ट होऊ शकतो. हृदयविकाराच्या झटक्यासारख्या समस्या टाळायच्या असतील तर त्याची लक्षणे जाणून घेणे गरजेचे आहे. तज्ज्ञांकडून जाणून घेऊया की पाठीच्या एका भागात सतत दुखणे हे हृदयविकाराचे लक्षण आहे का?

country first heart liver transplant surgery success led by dr anvay mulay
देशातील पहिली हृदय-यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी!
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Onion prices fall due to increased production
नाशिक : आवक वाढल्याने कांद्याची घसरण
Man beaten Young woman on stage who was performing shocking video viral on social media
कोणाच्या परिस्थितीचा असा फायदा घेऊ नका! त्याने भरस्टेजवरच तरुणीबरोबर ‘असं’ काही केलं की…, VIDEO पाहून येईल संताप
brain rot disease loksatta news
विश्लेषण : ‘ब्रेन रॉट’ यंदाचा ऑक्सफर्ड शब्द मानकरी! पण ही अवस्था नक्की काय असते? हा चिंताजनक विकार का?
Bharat Gogawale, Bharat Gogawale minister desire,
भरत गोगावले यांची मंत्रिपदाची इच्छा यंदा तरी पूर्ण होणार का ?
Cold weather Thane district, Thane district temperature,
ठाणे जिल्हा पुन्हा गारठला, जिल्ह्यातील तापमान सरासरी १२ अंश सेल्सिअस
Moong dal health benefits
दररोज भिजवलेले मूग खाणं आरोग्यासाठी घातक? मग तज्ज्ञ काय सांगतात…

( हे ह वाचा: Low Uric Acid: यूरिक अॅसिडचे प्रमाण कमी होणे देखील ठरू शकते घातक; होऊ शकतात ‘हे’ ५ गंभीर आजार)

पाठीच्या या भागात दुखणे हे हृदयविकाराच्या झटक्याचे लक्षण असू शकते का?

जर तुम्हाला शरीरात सतत पाठदुखी होत असेल आणि ही वेदना सतत सुरू असेल तर हे हृदयविकाराच्या झटक्याचे लक्षण असू शकते. जर तुम्हाला वारंवार पाठदुखी होत असेल तर तुम्ही ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधावा. डॉ. रुची शाह , इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट, मसिना हॉस्पिटल, मुंबई यांनी सांगितले की, जर लोकांना हृदयविकाराच्या लक्षणांची वेळीच जाणीव झाली, तर त्वरित वैद्यकीय मदत घेतल्यास रुग्णाचा जीव वाचू शकतो.

कार्डियाक अरेस्ट म्हणजे काय? What is cardiac arrest?

कार्डियाक अरेस्ट हा हृदयविकाराच्या झटक्यानंतर येतो. हृदयविकाराचा झटका म्हणजे हृदयाच्या मुख्य धमन्यांपैकी एकामध्ये रक्त पोहोचण्यास अडथळा निर्माण होणे ज्यामुळे हृदयाला अचानक नुकसान होते. जेव्हा हृदय काम करणे थांबवते, तेव्हा हृदयामध्ये इलेक्ट्रीकल डिसटरबेंस होऊ शकते, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. छातीत दुखणे हे देखील हृदयविकाराचे एक सामान्य लक्षण आहे. कार्डियाक अरेस्टमुळे शरीरात कुठेही वेदना होऊ शकतात. ही वेदना समोर, डावा किंवा उजवा खांदा, डावा हात, उजवा हात, पोटाचा वरचा भाग, जबडा, मान, मागच्या दोन खांद्याच्या ब्लेडमध्ये किंवा हनुवटीपासून नाभीपर्यंत कुठेही होऊ शकतो.

( हे ही वाचा: तुम्ही देखील तुमच्या गरजेपेक्षा जास्त व्हिटॅमिन डी चे सेवन करताय? यामुळे शरीरावर होणारे ४ दुष्परिणाम जाणून घ्या)

डॉ झाकिया खान, वरिष्ठ सल्लागार-इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजी, फोर्टिस हॉस्पिटल, म्हणतात की हृदयाशी संबंधित बहुतेक प्रकरणांमध्ये, समस्या सौम्य वेदना किंवा अस्वस्थतेने सुरू होतात. छातीत दुखणे आणि पाठदुखी हे हृदयविकाराच्या सर्वात सामान्य लक्षणांपैकी एक आहे.

शरीरात लक्षणे दिसू लागल्यास काय करावे?

जर एखाद्या व्यक्तीला हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणे जाणवत असतील तर ताबडतोब डॉक्टरांना भेटा. छातीत दुखणे आणि पाठदुखी ही हृदयविकाराची प्रमुख कारणे आहेत. तुमच्या हृदयाची स्थिती जाणून घेण्यासाठी ताबडतोब ECG, ECHO, TMT करा.

Story img Loader