Balayam Yoga : प्रत्येकाला स्वत:चे केस आवडतात. निरोगी केसांसाठी अनेकजण वाट्टेल ते प्रोडक्ट वापरतात. सुंदर केसांसाठी खरंच बालयाम फायदेशीर आहे का? आता तुम्हाला वाटेल की हा बालयाम म्हणजे नेमका काय? बालयाम हा एक योगा आहे. बाल म्हणजे केस आणि याम म्हणजे व्यायाम. केसांसाठी केला जाणारा व्यायाम म्हणजेच बालयाम होय.
इन्स्टाग्रामवर योग अभ्यासक मृणालिणी यांनी एक पोस्ट शेअर करत बालयाम कसा करायचा आणि त्याचे फायदे सांगितले आहेत. या व्हायरल व्हिडीओमध्ये त्या बालयाम करताना दिसत आहे. हाताची नखं एकमेकांवर घासताना दिसत आहे. होय, नखं एकमेकांवर घासणे म्हणजेच बालयाम होय. या व्हिडीओवर त्यांनी लिहिलेय, “बालयाम केसांसाठी खरंच उपयुक्त आहे का?”
याचे उत्तर सुद्धा त्यांनी कॅप्शनमध्ये दिले आहेत. त्या कॅप्शनमध्ये लिहितात, ‘बाल’ म्हणजे ‘केस’ आणि ‘व्याम’ म्हणजे व्यायाम. तर, बालयम योग म्हणजे केसांसाठी व्यायाम. बालयाम योग हा योग आणि एक्यूप्रेशर मधील प्रकार आहे ज्यामध्ये दोन्ही हातांची नखे एकमेकांवर घासली जातात.
बालयाम योग रिफ्लेक्सोलॉजीच्या तत्त्वांवर कार्य करते, तुमच्या केसांचे मूळ तुमच्या नखाच्या मज्जातंतूंच्या टोकाशी जोडलेले असतात. म्हणून जेव्हा तुम्ही या मज्जातंतूंच्या टोकाला उत्तेजित करता तेव्हा ते तुमच्या टाळूमध्ये रक्त परिसंचरण सुधारते. त्यामुळे खालील फायदे होतात.
१. केसांच्या वाढीस चालना मिळते.
२. अकाली केस पांढरे होणे कमी होते.
३. इतर केसांच्या समस्या, ऑईली स्काल्प, कोंडा कमी होण्यास मदत होते.
४. केसांचे आरोग्य सुधारते.
रोज १० मिनिटे बालयाम करा. याचबरोबर केसांच्या आरोग्यासाठी,
केसांची योग्य स्वच्छता राखा, तणावमुक्त जीवनशैली आणि निरोगी आहाराच्या सवयी आत्मसात करा. आहारात प्रथिने, जीवनसत्त्वे आणि लोह पुरेशा प्रमाणात घ्या.”
हेही वाचा : Reasons for a Late Period : तुम्हाला मासिक पाळी उशीरा येते का? ही असू शकतात कारणे, जाणून घ्या
yogamarathi_ या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन मृणालिनी यांनी हा व्हिडीओ शेअर केला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिली आहेत. एका युजरने लिहिलेय, “हो, हे खरंय. मी स्वत: अनुभव घेतला आहे.” तर एका युजरने लिहिलेय, “धन्यवाद ताई” आणखी एका युजरने लिहिलेय, “अजून एक उत्कृष्ट प्रदर्शन. धन्यवाद योगागुरू. आता कळले या क्रियेला बालायाम म्हणतात.” एकाने विचारलेय , “दिवसातून किती वेळा आणि किती वेळ करायला हवे?”