Crying Benefits: रडणे किंवा रडू येणे ही एक नैसर्गिक प्रतिक्रिया आहे. याचा संबंध आनंद, दु:ख, राग अशा विविध मानवी भावभावनांशी असतो. लहान बाळाच्या रडण्याने आईचे लक्ष वेधले जाते. आपण जेव्हा दु:खात असतो, तेव्हा रडतो. आनंदात असताना नकळत डोळ्यातून आनंदाश्रू वाहतात. कधीकधी हसतानाही आपल्या डोळ्यांमधून पाणी येते. काही जणांना भीती वाटली की ते रडू लागतात. थोडक्यात अश्रू हे मानवी भावनांसह डोळ्यांमधून येत असतात. रडण्याने डोळे निरोगी राहतात. रडून झाल्यावर छान झोप लागते हा अनुभव तुम्हाला आला असेल.

रडण्याबाबत माहिती देताना थेरपिस्ट अ‍ॅना पापायनोऊ म्हणतात, “रडणे ही मानवी शरीराची सामान्य प्रतिक्रिया आहे. रडण्याने वेदना कमी होतात, डोळे निरोगी राहतात. तसेच सपोर्ट नेटवर्क तयार करण्याची क्षमता वाढते.” त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी रडण्यामुळे शरीराला कसा फायदा होतो हे सांगितले आहे. त्याव्यतिरिक्त त्यांनी अश्रूंच्या प्रकारांची माहितीदेखील दिली आहे.

Market Technique Stock Market
बाजाराचा तंत्र-कल : शेअर बाजाराला बाळसं की सूज?
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Two houses including shop damaged in fire in Fernandiswadi
नाशिक : फर्नांडिसवाडीतील आगीत दुकानासह दोन घरांचे नुकसान
minor boy stabbed his mother
कोवळ्या वयात एवढा राग…मुंबईत अल्पवयीन मुलाकडून आईवर चाकूने हल्ला, महिलेवर शीव रुग्णालयात उपचार सुरू
Success Story Of Chitraang Murdia
Success Story Of Chitraang Murdia : एकेकाळी होता आयआयटी टॉपर, डॉक्टर होण्यासाठी सगळंच सोडलं; वाचा, चित्रांग मुरडियाची गोष्ट
Sudhakar khade murder
सांगली: भाजपचे पदाधिकारी सुधाकर खाडे यांचा जमिनीच्या वादातून खून
hya goshtila navach nahi 3
नितांतसुंदर दृश्यानुभूती
Aai Baba Retired hot ahet Marathi Serial entertainment news
आईला निरोप आणि आईबाबांचे स्वागत…

अ‍ॅना पापायनोऊ यांनी सांगितलेले अश्रूंचे प्रकार –

  • Basal tears : यांमध्ये आयसोझाइम (Iysozyme) नावाचे द्रव्य असते. या द्रव्यामध्ये अ‍ॅन्टीमायक्रोबायल गुणधर्म असतात. यांच्यामुळे डोळे ओलसर राहण्यास मदत होते.
  • Reflex tears : डोळ्यांना एखाद्या गोष्टीचा त्रास झाल्यास प्रतिक्रिया म्हणून हे अश्रू डोळ्यांमधून बाहेर येतात. कांदा कापताना किंवा डोळ्यांमध्ये धूळ गेल्यावर येणारे अश्रू हे रिफ्लेक्स टीयर्स असतात.
  • Emotional tears : दु:ख, राग, चिडचिड झाल्यावर आपण जेव्हा रडतो, त्या वेळेस डोळ्यांमधून इमोशनल टीयर्स येतात. वेदना शांत व्हाव्यात यासाठी ही क्रिया घडत असते. या अश्रूंमध्ये स्टेस हार्मोन असतो, ज्याच्यामुळे शरीरातील कोर्टिसोलचे प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते.

आणखी वाचा – अंगावर काटा येतो तेव्हा नेमकं काय घडतं? या अनियंत्रित शारीरिक प्रक्रियेमागील कारण तुम्हाला ठाऊक आहे का?

थेरपिस्ट अ‍ॅना यांनी रडण्याने शरीराला कसा फायदा होतो याबाबत खास माहिती दिली.

१. मानवी अश्रूंमुळे शरीरातील मज्जातंतूंची वाढ होण्यास मदत होते. यामुळे न्यूरॉन्सची वाढ होते आणि त्यांचे शरीरातील प्रमाण नियंत्रणात राहते.

२. रडण्यामुळे स्ट्रेस हार्मोन्स कमी होतात. स्ट्रेस हार्मोन्सची संख्या कमी झाल्याने मन शांत होते. तसेच पॅरासिम्पेथेटिक नर्व्हस सिस्टीम सक्रिय होते.

३. रडणे ही शरीराची नैसर्गिक प्रतिक्रिया असते. डोळ्यांमधून अश्रू आल्याने वेदना कमी होण्यास मदत होते. रडण्यामुळे एंडोर्फिन आणि ऑक्सिटोसिन या हार्मोन्सचे प्रमाण वाढते.

आणखी वाचा – स्विमिंग पूलमध्ये त्वचा टॅन होऊ शकते का? जाणून घेऊया, याबाबतचे तज्ज्ञांचे मत

४. अश्रूंमुळे डोळे स्वच्छ, निरोगी राहतात. रडण्यामुळे डोळे ओलसर राहण्यास मदत होते.

५. रडण्यामुळे तणाव कमी होतो. रडू आल्याने शरीर स्ट्रेस हार्मोन्सपासून दूर राहते.