Sleep at noon : सध्या हिवाळा सुरू आहे. हिवाळ्यात थंडीमुळे अंथरुणातून बाहेर पडणे कठीण वाटते. हिवाळ्यात आळस खूप जास्त होतो.थंडीमुळे शारीरिक हालचाली कमी होतात त्यामुळे काही लोक दिवसभर अंथरुणातून पडलेले असतात. अनेकांना दुपारी झोपायची सवय असते. तुम्हाला सुद्धा दुपारी झोपायची सवय आहे का? जर हो, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.
दुपारी झोपल्यानंतर खरंच वजन वाढतं का? आज आपण या विषयी जाणून घेणार आहोत. सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दुपारी झोपणे आपल्या आरोग्यासाठी चांगले आहेत की नाही, याविषयी सांगितले आहे.
हेही वाचा : Eating Fruit at Night: रात्रीच्या वेळी फळ खाल्ले पाहिजे का? जाणून घ्या फळ आणि ज्यूस घेण्याची योग्य वेळ
इन्स्टाग्रामवर डॉ. मानसी मेहेंदळे यांनी या संदर्भात एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्या सांगतात, “दुपारी झोपलं तर वजन वाढेल का? बघा, आयुर्वेद असं म्हणतं की दुपारी झोपू नये म्हणजे वामकुक्षी ही घ्यावी. १४ ते २० मिनिटे तुम्ही दुपारी झोपलात तर नक्की चालेल पण एक तास, दोन तास, असे जर तुम्ही झोपलात तर त्यामुळे तुमच्या पचन संस्थेवर फरक पडतो म्हणजे तुमचं पचन त्यामुळे बिघडत असतं, कफदोष वाढत असतो त्यामुळे उठल्यावर आळस येणे, डोकेदुखी, डोकं जड वाटणे, इत्यादी त्रास होतो. त्यामुळे दुपारी झोपायचं असेल तर फक्त वामकुक्षी घ्यायची. ज्यामुळे तुमचं पचन चांगलं होतं आणि रक्ताभिसरण वाढतं आणि आपलं आरोग्य उत्तम राहतं.”
त्या पुढे सांगतात, “दुपारी झोपायचं असेल तर फक्त १५ मिनिटे झोपायचं आणि ते सुद्धा बसून झोपल्यासारखं. पूर्वी आराम खूर्ची घरी असायची, त्या पोझिशनमध्ये आपण झोपायचं आहे. त्यामुळे कफप्रकोप होत नाही आणि दुपारी झोपलं तरी आपल्याला त्रास होत नाही.”
पाहा व्हायरल व्हिडीओ (Video Viral)
हेही वाचा : आवळा खाण्याचा उत्तम मार्ग कोणता? ‘ही’ जुगाड वापरून पाहा, गायब होईल सर्व तुरटपणा, मिळतील दुप्पट फायदे
healyourselfwith_manasikrishna या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “दुपारी झोपलं तर वजन वाढतं का ?” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “खूप खूप छान माऊली अभिनंदन” तर एका युजरने लिहिलेय, “छान माहीती धन्यवाद” आणखी एका युजरने लिहिलेय, “मी दुपारी अडीच ते तीन तास झोपतो हा.. जवळजवळ ३५ ते ४० वर्षे झाली. मला कोणत्याही कफाचा त्रास नाही”