अनेक जण बाहेरचं हॉटेल, ढाबा, रेस्टॉरंटमधील जेवण आवडीने खातात. तर काहींना ऑनलाईन किंवा रस्त्यावरील खाद्यपदार्थ आवडतात. परंतु बाहेर खाण्याची ही पद्धत तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरु शकते. होय, कारण बाहेरील अन्नपदार्थांमध्ये अनेकदा भेसळ किंवा स्वच्छतेचा अभाव दिसून येतो. यामुळे अन्नातून होणारी विषबाधा आणि पोटाचा संसर्ग यांसारख्या आजारांना बळी पडू शकता. यात विशेषत: पालेभाज्यांपासून तयार केलेले पदार्थ खाणं तुम्ही टाळल पाहिजे. कारण पालेभाज्यांमध्ये अनेकदा वेगवेगळे गवत आणि इतर रानभाज्या देखील असतात ज्या नीट साफ न करताच बनवल्या जातात. त्यामुळे तुम्ही विविध आजारांना बळी पडू शकता.
यामुळे पालकाची भाजी किंवा कोणत्याही पालेभाज्या हॉटेल, रेस्टॉरंट किंवा ढाब्यावर खाणं आरोग्यसाठी धोकादायक ठरू शकते. कारण रेस्टॉरंट्स आणि स्ट्रीट फूडमध्ये पाले भाज्यांमध्ये बरसीम गवताची भेसळ असू शकते. हे गवत प्राण्यांचे खाद्य आहे त्यामुळे हे जर मानवाने खाल्ले तर पचनसंस्था बिघडू शकते. तसेच अपचन, गॅस आणि जुलाब होऊ शकते.
यासोबत पालेभाज्यांमध्ये अनेकदा तण किंवा जंगली गवतही असते. अनेक हॉटेल किंवा रेस्टॉरंटवाले ह्या भाज्या नीट साफ न करता, न धुता वापरतात. यामुळे अनेक सूक्ष्मजंतू किंवा कीटक त्यात राहू शकतात यामुळे तुम्हाला विविध आजारांचा धोका निर्माण होतो. याशिवाय अनेक ठिकाणी पालकासोबत मुळ्याची पाने, कोबीची पाने आणि इतर गोष्टींचीही भेसळ असू शकते. हे आपल्या पोटासाठी घातक ठरू शकते.
खराब पालेभाज्यांमुळे अनेक आजार होऊ शकतात. या भाज्या नीट साफ न करता, न धुता वापरल्याने पोटात जंतू होऊ ते मेंदूपर्यंत जाऊ शकतात. अशापरिस्थितीत गंभीर आजारांपासून वाचण्यासाठी हॉटेलमधील पालेभाज्या खाणे शक्यतो टाळल्या पाहिजेत.