भारतात सामान्यपणे नवजात बाळाला काजळ लावण्याची पद्धत आहे. काजळ लावल्यामुळे डोळे सुंदर होतात आणि निरोगीदेखील राहतात, असं वृद्ध लोकांचं मत आहे. आजही भारतात बऱ्याच कुटुंबांमध्ये लहान बाळांना दृष्ट लागू नये यासाठी काजळ लावलं जातं. पण, लहान मुलांच्या नाजूक डोळ्यांमध्ये काजळ घालणं अयोग्य असल्याचं डॉक्टरांचं मत आहे. मात्र तुम्हाला माहीत आहे का, वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिल्यास नवजात बाळाच्या डोळ्यात काजळ घातल्याने गंभीर परिणाम होऊ शकतात. काजळ बनविण्यासाठी ५० टक्क्यांहून अधिक लेडचा वापर केला जातो. जे बाळाच्या डोळ्यांसाठी हानिकारक असतं. लेड फक्त डोळ्यांनाच नाही तर किडनी, मेंदू, बोन मॅरो आणि शरीराच्या इतर भागांनादेखील प्रभावित करतं. जाणून घेऊ या बाळाच्या डोळ्यांत काजळ घातल्यामुळे काय काय परिणाम होतात?

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काजळ बनवण्यासाठी भरपूर प्रमाणामध्ये लीडचा वापर केला जातो. शिसं आरोग्यासाठी हानिकारक आहे. किडनी, मेंदू आणि शरीराच्या इतर भागावर याचा वाईट परिणाम होतो. शरीरामध्ये लीडचं प्रमाण वाढलं तर, व्यक्ती कोमामध्ये जाऊ शकते. इतकंच नाही तर, मृत्यू ओढवू शकतो. त्यामुळेच लहान बाळांच्या शरीरामध्ये शिसं न गेलेलं चांगलं. नाहीतर त्यांच्यावरही वाईट परिणाम होण्याची भीती असते.

​डोळ्यातील तेज कमी होऊ शकतं

अनेकदा लहान मुलांचे डोळे किंवा त्यांचे आयब्रोला काजळमुळे त्रास होतो. मुलांच्या डोळ्यांच्या रोशनीला यामुळे त्रास होऊ शकतो. तसेच मुलांच्या डोळ्यांचा मध्यभाग, बुभूळ तसेच कार्नियाला त्रास होऊ शकतो. याला काजळाचा खूप मोठा त्रास होतो. डोळ्याच्या या भागाला त्रास झाल्यास खूप मोठं नुकसान होतं. डोळे सुंदर व्हावेत, तजेलदार व्हावेत या उद्देशाने काजळ लावलं जातं. पण हेच काजळ बाळाच्या डोळ्यांच्या तेजाला हानिकारक आणि घातक ठरू शकते.

डोळ्यातून सतत पाणी येण्याची समस्या उद्भवू शकते

अनेकदा बाजारात मिळणारं काजळ आपण वापरतो. ज्यामुले बाळाचे डोळे लाल होतात. बाजारात बनवल्या जाणाऱ्या काजळमध्ये लेडचा समावेश असतो. ज्यामुळे बाळाच्या मेंदूची वाट खुंटली जाते. तसेच डोळ्यात काजळ लावल्यामुळे रेजनेसचा त्रास होतो. यामुळे खास येणे आणि डोळ्यात जळजळ होण्यासारखी समस्या उद्भवते. इतक्या कमी वयात असा त्रास झाल्यास बाळांच्या डोळ्यांची जोखीम भविष्यात वाढू शकते. डोळ्यांना सतत खाज आल्यामुळे मुलांच लक्ष विचलित होतं आणि त्यांना त्याचा त्रास होतो.

डोळ्यांना खाज येणे –

अनेकदा बाजारात मिळणारं काजळ आपण वापरतो. ज्यामुले बाळाचे डोळे लाल होतात. बाजारात बनवल्या जाणाऱ्या काजळमध्ये लेडचा समावेश असतो. ज्यामुळे बाळाच्या मेंदूची वाट खुंटली जाते. तसेच डोळ्यात काजळ लावल्यामुळे रेजनेसचा त्रास होतो. यामुळे खास येणे आणि डोळ्यात जळजळ होण्यासारखी समस्या उद्भवते. इतक्या कमी वयात असा त्रास झाल्यास बाळांच्या डोळ्यांची जोखीम भविष्यात वाढू शकते. डोळ्यांना सतत खाज आल्यामुळे मुलांच लक्ष विचलित होतं आणि त्यांना त्याचा त्रास होतो

घरी बनवलेले काजळ बाळासाठी योग्य आहे का?

लहान मुलांना काजळ लावणे हे डॉक्टरांच्या दृष्टीने अयोग्य आहे. याचे महत्वाचे कारण म्हणजे, तेल संपूर्ण जळून गेल्यानंतर राहिलेल्या काजळीमध्ये कार्बनचे प्रमाण खूप जास्त असते. या काजळीला आपण काजळ म्हणून लहान मुलांच्या डोळ्यात घालत असतो. ही कार्बनयुक्त काजळी बाळांच्या नाजूक डोळ्यांसाठी अजिबात चांगली नाही.

हेही वाचा – Kidney Health: एका किडनीवर माणूस किती दिवस जगू शकतो? जाणून घ्या सत्य…

बाहेरील काजळ चांगले आहे का?

आजकाल अनेक बेबी प्रोडक्ट्समध्ये काजळाचा देखील समावेश केला गेला आहे. मात्र बाहेरच्या काजळामध्ये शिसे या धातूचे प्रमाण खूप जास्त आहे. असे काजळ बाळांच्या डोळ्यांमध्ये घातले तर त्यांचे डोळे लाल होणे, डोळ्यांना खाज येणे आदी त्रास जाणवू शकतो.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Is it safe to put kajal on baby eyes know what expert says srk