Corn Flakes : कॉर्नफ्लेक्सकडे एक उत्तम न्याहरी म्हणून पाहिलं जातं. कॉर्नफ्लेक्सचे जनक डॉ. जॉन हार्वे केलॉग यांनी अमेरिकेतल्या लोकांनी स्वतःवर संयम ठेवावा म्हणून कॉर्न फ्लेक्सची निर्मिती केली असं बोललं जातं. आजही कॉर्नफ्लेक्स केलॉग कॉर्नफ्लेक्स या नावानेच ओळखले जातात. विविध ब्रांड्सचे कॉर्नफ्लेक्स आत्ताच्या घडीला बाजारात आले आहेत. मात्र मूळ कॉर्नफ्लेक्स केलॉग या नावाने ओळखले जातात. अनेक लोक दुकानात कॉर्नफ्लेक्स घ्यायला गेल्यानंतर केलॉग्ज द्या असंच म्हणतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

फोर्ब्सने काय म्हटलं आहे?

फोर्ब्सच्या माहितीनुसार कॉर्नफ्लेक्स हे एक उत्तम तृणधान्य होतं. त्यामुळे अमेरिकन लोकांची पचन क्रिया तर सुधारेलच शिवाय एका पापा पासून त्यांना दूर जाता येईल. हे पाप म्हणजे हस्तमैथुन करण्याची सवय. हस्तमैथुन करण्याच्या पापापासून अमेरिकन नागरिकांना वाचवलं जाईल या अनुषंगाने ही निर्मिती केली गेली असावी.

१९ व्या शतकात लागला कॉर्नफ्लेक्सचा शोध

कॉर्नफ्लेक्स खाल्ल्याने हस्तमैथुन करण्याची इच्छा आणि लैंगिक संबंध ठेवण्याची इच्छा कमी होते. १९ व्या शतकात कॉर्नफ्लेक्सचा शोध लागला आहे. त्याचा एक उद्देश हस्तमैथुनाच्या पापापासून अमेरिकन्सना दूर नेणं असाही होता असं कळतंय. शेफ सुनील चौहान यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या माहितीनुसार “डॉ. जॉन हार्वे केलॉग यांना त्या काळी हे वाटत होतं की अमेरिकन नागरिक मांसयुक्त आहार करतात, त्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात पचन समस्या उद्भवतात. तसंच कामेच्छा जागृत होण्याचं प्रमाण वाढतं. त्यातून अमेरिकन नागरिक हस्तमैथुन करण्यासारख्या पापाकडे वळतात. अशावेळी आहारावर नियंत्रण ठेवलं गेलं तर या पापासून अमेरिकन नागरिकांना वाचवता येईल. तसंच अमेरिकन नागरिकांची पचनक्रियाही सुधारु शकेल.”

बिराजा राऊत यांनी काय मत मांडलं आहे?

Foodpreneur बिराजा राऊत यांनी दिलेल्या माहितीनुसार १९ व्या शतकाचा जो उत्तरार्ध होता त्या काळात आरोग्य, आत्मसंयम, नैतिकता असे व्हिक्टोरियन आदर्श पाळले जात होते. संयमाला अधिक महत्त्व होतं. मद्यपान करणं, धूम्रपान करणं, हस्तमैथुन करणं अशा अनैतिक कृत्यांमध्ये कुणीही गुंतू नये असा त्या काळात आदर्शवादी असलेला विचार होता. या विचारांचा प्रभाव जॉन हार्वे केलॉग यांच्यावर पडला. त्यातून त्यांनी अमेरिकन नागरिकांना हस्तमैथुनाच्या पापापासून लोकांना वाचवण्याच्या उद्देशानेही केलॉग यांनी कॉर्न फ्लेक्सची निर्मिती केली होती.

आलोक सिंह यांनी नेमकं काय म्हटलं आहे?

केलॉग यांना हे वाटत होतं की सकस आहार हा अनैतिक गोष्टींपासून लोकांना दूर ठेवतो. सकस आहार घेतला तर विचार सुधारतात ही त्यांची धारणा होती. अन्न हे शुद्ध आणि सात्विक असलं पाहिजे असं डॉ. केलॉग यांचं ठाम मत होतं. दरम्यान अन्न इतिहास आणि विज्ञान या विषयातले तज्ज्ञ आलोक सिंह यांनी वेगळं मत मांडलं आहे. “कॉर्नफ्लेक्सचा शोध लागला त्यात हस्तमैथुनापासून अमेरिकन नागरिकांना वाचवणं असा होता यात काही प्रमाणात अतिशोयक्ती आहे. केलॉग यांना वाटत होतं की लोकांना सकस आहार मिळावा त्यातून कॉर्न फ्लेक्सची निर्मिती झाली. फक्त अमेरिकेतल्या लोकांच्या लैंगिक इच्छांना, काम भावनांना आळा घालणं हाच कॉर्न फ्लेक्सचा उद्देश नव्हता. पौष्टिक आणि पचण्यास सोपं अन्न म्हणू त्याकडे पाहिलं गेलं. अमेरिकन लोक नाश्ता करताना मांस, बटाटे, केक, पेस्ट्रीज खात होते. त्या सगळ्यांना पर्याय म्हणून याची निर्मिती झाली.”