Lemongrass: लेमनग्रास ही वनस्पती गवतासारखी दिसते. हे औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे. याचा वास लिंबासारखा असतो. बऱ्याच लोकांचा असा विश्वास आहे की, लेमनग्रास ही लिंबूपासून बनलेली एक प्रजाती आहे. तर लेमनग्रासमध्ये अनेक औषधीय गुण असतात. याबद्दल अधिक माहिती जाणून घेतली तर तुम्हालाही आश्चर्य वाटेल. जाणून घेऊया काय आहेत याचे खास फायदे आणि नुकसान. पण त्याआधी जाणून घेऊया नक्की काय आहे लेमनग्रास.

लेमनग्रास म्हणजे काय?
लेमनग्रास एक औषधीय झाड आहे, जे विशेषतः दक्षिण – पूर्व आशियामध्ये आढळतं. हे गवताप्रमाणेच दिसतं. पण त्याची उंची ही गवतापेक्षा थोडी जास्त असते. तर याचा सुगंध हा लिंबाप्रमाणे असतो. त्यामुळेच याला लेमनग्रास असं म्हटलं जातं. याचा जास्त उपयोग हा चहा बनवताना त्यात स्वाद निर्माण करण्यासाठीही करण्यात येतो. लेमनग्रासमध्ये अँटिबॅक्टेरियल, अँटिइन्फ्लेमेटरी आणि अँटिफंगल गुण आढळतात. तुम्हाला अनेक आजारांपासून हे गुण वाचवण्याचं काम करतात. लेमनग्रासचं तेल औषध म्हणून वापरण्यात येतं.

Can eating papaya mangoes help you build muscle
पपई-आंबा खाल्ल्याने स्नायूंच्या निर्मितीसाठी मदत होऊ शकते का? तज्ज्ञांचे काय आहे मत…
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Ramphal health benefits In Marathi
Ramphal : रोज रामफळ खाल्ल्याने शरीराला नेमका काय फायदा मिळू शकतो? डॉक्टरांची माहिती वाचून व्हाल खूश
penaut oil for diabetis patients?
शेंगदाण्याचं तेल डायबेटिस असणाऱ्यांनी वापरावं का?
drinking tea is beneficial to health?
चहाची तलफ आलेय, काय करावं?
is alcohol good for health
दारू प्यावी का? आयुर्वेद काय सांगतं?
healthy honey
भेसळयुक्त मध कसा ओळखावा? चांगला मध शरीराला कसा फायदेशीर ठरतो?
cardamom water benefits
वेलचीचे अशाप्रकारे सेवन केल्यास शरीरात दिसतील ‘हे’ आश्चर्यकारक बदल, तज्ज्ञांनी सांगितले जबरदस्त फायदे

लेमनग्रासचे फायदे

  • कोलेस्ट्रॉल राहते नियंत्रणात
    शरीरामध्ये कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढल्याने स्ट्रोक आणि हृदयरोगासारख्या आजारांची समस्या वाढते. अशावेळी लेमनग्राससारख्या औषधीय गुण असलेल्या वनस्पतींचा वापर करावा. कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठी तुम्ही लेमनग्रासचा उपयोग करून घेऊ शकता. एका वैज्ञानिक अभ्यासानुसार, लेमनग्रासचं तेल वापरल्याने रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठी मदत मिळते.-
  • पोटासाठी लेमनग्रासचे फायदे
    लेमनग्रासमुळे तुमची पचनशक्ती वाढवण्यास मदत मिळते. त्याशिवाय यामध्ये आढळणाऱ्या अँटिऑक्सिडंट्स गुणांमुळे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसपासून वाचण्यासाठी आणि पोटामधील अल्सर आणि पोटातील संबंधित अनेक समस्या थांबवण्यासाठी याचा उपयोग करून घेता येतो. पोटाच्या समस्या तुम्हाला लवकर बऱ्या करायच्या असतील तर तुम्ही लेमनग्रासचा काढा करूनदेखील पिऊ शकता.

आणखी वाचा : High cholesterol: ‘हा’ पदार्थ करेल तुमच्या रक्तातील खराब कोलेस्ट्रॉल कमी; जाणून घ्या आश्चर्यकारक फायदे

  • कॅन्सरवरही गुणकारी
    लेमनग्रास असो अथवा लेमनग्रास तेल असो या दोन्हीमध्ये अँटिकॅन्सर गुण आढळतात. जे कॅन्सरच्या पेशी नष्ट करून कॅन्सरपासून वाचवण्यासाठी फायदेशीर ठरतात. त्याशिवाय तुम्ही कॅन्सरच्या पेशी नष्ट करण्यासाठी लेमनग्रासचा चहादेखील पिऊ शकता. तुम्ही याचं नियमित सेवन केल्यास, कॅन्सरच्या पेशी नष्ट करण्यासाठी याची मदत होते.
  • वजन कमी करण्यासाठी उपयुक्त
    वजन कमी करण्यासाठी आपण अनेक उपाय करतो. पण त्यापैकी वजन कमी करण्यसाठी उपयुक्त असा उपाय म्हणजे लेमनग्रास. लेमनग्रासमध्ये असणारे मूत्रवर्धक गुण शरीर डिटॉक्सिफाय होण्यासाठी फायदेशीर ठरतात. तसंच युरिनद्वारे विषारी पदार्थ बाहेर काढून टाकण्यासाठी लेमनग्रासचा उपयोग होतो. डिटॉक्सिफिकेशनमुळे तुमचं वजन कमी होण्यास मदत मिळते असं म्हटलं जातं. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी लेमनग्रास तुम्ही वापरू शकता.

लेमनग्रासने होणारे नुकसान

तसं तर लेमनग्रास हे सेवन करण्यास सुरक्षित आहे. पण याचं अधिक प्रमाणात सेवन केल्यास, त्रासदायक ठरतं. लेमनग्रासने नक्की काय नुकसान होऊ शकतं हे पाहूया –

  • चक्कर येणं
  • अधिक भूक लागणं
  • चेहरा सुजणं
  • थकवा

Story img Loader