High Cholesterol Symptoms in Tongue: वाढत्या कोलेस्टेरॉलमुळे अनेक आरोग्य समस्या उद्भवू शकतात. हा आजार चाचण्यांद्वारे ओळखला जातो, परंतु या आजाराची काही लक्षणे शरीरातही दिसू लागतात. कोलेस्टेरॉल हा चरबीसारखा चिकट पदार्थ आहे जो खराब आहारामुळे तयार होतो. वाढत्या कोलेस्टेरॉलमुळे रक्तवाहिन्यांमध्ये प्लेक तयार होऊ शकतो, ज्यामुळे रक्त परिसंचरण थांबू शकते. ज्या लोकांचे वजन जास्त आहे आणि त्यांच्या शरीरात चरबी जास्त आहे त्यांना कोलेस्टेरॉल जास्त होण्याची शक्यता असते.
वाढलेल्या कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा झटका, रक्तदाब यांसारख्या आजारांचा धोका असतो. कोलेस्टेरॉल वाढल्यामुळे शरीरात घाम येणे, थकवा येणे, अशक्तपणा, भूक न लागणे अशी अनेक लक्षणे दिसू लागतात. या व्यतिरिक्त, अशी काही लक्षणे आहेत, जी तुम्ही तुमच्या जिभेवर देखील पाहू शकता. जाणून घेऊया कोलेस्टेरॉल वाढल्यामुळे जिभेचा रंग कसा दिसतो?
जिभेचा कोणता रंग कोलेस्ट्रॉल वाढल्याचे संकेत देतात?
‘फ्रंटियर्स इन मेडिसिन’ नुसार गडद जांभळ्या रंगाची जीभ आणि वाढलेली सबलिंग्युअल नस ही रक्तातील कोलेस्टेरॉल वाढण्याची महत्त्वाची चिन्हे आहेत. कोलेस्टेरॉल वाढल्यामुळे, जिभेच्या टोकावर जांभळा निळा रंग असतो, जो रक्तातील वाढत्या कोलेस्टेरॉलचे डाग आहे. शास्त्रज्ञांच्या मते, सबलिंग्युअल नसा काळ्या, वाकड्या आणि जाड असतात.
रक्त साचणे आणि उच्च कोलेस्टेरॉल
जिभेवर रक्त साचणे हे कोलेस्टेरॉल वाढल्याचे लक्षण आहे. जेव्हा ऊतींमधून रक्त योग्यरित्या वाहू शकत नाही, तेव्हा ते रक्तप्रवाहाचा वेग कमी करू शकते आणि अडथळा निर्माण करू शकते. त्यामुळे वाहिन्यांमधील दाब वाढू शकतो.
( हे ही वाचा: कांद्याचे सेवन केल्याने Blood Sugar झपाट्याने कमी होऊ शकते; फक्त खाण्याची पद्धत एकदा जाणून घ्या)
जिभेचा रंग का बदलतो
बहुतेक प्रकरणांमध्ये, जांभळ्या रंगाची जीभ म्हणजे तुमच्या शरीरात रक्त परिसंचरण नीट होत नाही आणि कोलेस्टेरॉल वाढत आहे. जिभेचा रंग बदलणे हे रक्त शरीराच्या ऊतींना पुरेसा ऑक्सिजन पुरवण्यात अयशस्वी झाल्याचे लक्षण आहे.
जिभेवर गडद लाल रक्त ऑक्सिजनची कमतरता असल्याचे दाखवते. ओरल कॅन्सर फाउंडेशनच्या मते, जिभेचा जांभळा रंग देखील तोंडाचा कर्करोग दर्शवू शकतो. जांभळी किंवा निळी जीभ देखील व्हिटॅमिनची कमतरता दर्शवू शकते.