Lucky bamboo plant care: घर किंवा ऑफिसमध्ये बांबूचे रोप लावणे खूप लकी मानले जाते, त्यामुळे आजकाल लोकांच्या घरात आणि ऑफिसमध्ये हे रोपटे मोठ्या प्रमाणात लावलेले असते. परंतु, या रोपाची वेळोवेळी काळजी घेणेदेखील खूप महत्त्वाचे आहे, नाहीतर ते काही दिवसातच सुकू शकते. खरंतर हे रोप घराच्या किंवा ऑफिसच्या आतमध्ये असते, त्यामुळे सूर्यप्रकाश त्याला मिळत नाही, त्यामुळे या रोपाची कशी काळजी घ्यावी हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
बांबूचे रोप सूर्यप्रकाशाशिवाय वाढू शकते का?
बांबू वनस्पती सूर्यप्रकाशाशिवाय वाढू शकते. परंतु, याचा अर्थ असा नाही की त्याला कोणत्याही प्रकारच्या प्रकाशाची आवश्यकता नाही. बांबूला मंद किंवा फिल्टर केलेला प्रकाश हवा असतो. जरी तुम्ही ते थेट सूर्यप्रकाश असलेल्या ठिकाणी ठेवत नसाल तरी कमीतकमी सकाळी किंवा संध्याकाळी खोलीत हलका सूर्यप्रकाश आला पाहिजे. जास्त सूर्यप्रकाशामुळे पाने जळतात, तर कमी प्रकाशामुळे झाडाची पाने लहान आणि रंगहीन होतात, यामुळे झाडाचे सौंदर्य कमी होते.
जर तुम्हाला बांबूचे रोप चांगले वाढवायचे असेल तर बांबूला पारदर्शक पडदे असलेल्या पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड असलेल्या खिडकीजवळ असलेल्या खोलीत ठेवा. या ठिकाणी बांबूला सूर्यप्रकाश मिळेल आणि त्यांची वाढही चांगली होईल.
हेही वाचा: काळ्या-पिवळ्या पडलेल्या प्लास्टिकच्या खुर्च्या ‘या’ तीन छोट्या उपायांनी करा स्वच्छ
बांबूचे रोप निरोगी ठेवण्यासाठी आठवड्यातून दोन किंवा तीन वेळा पाणी दिले पाहिजे. विशेषत: जमिनीत ओलावा जास्त किंवा कमी नाही याची खात्री करावी. जर तुमचे रोप पाण्यात उगवले असेल तर दर ८ ते १० दिवसांनी पाणी बदला आणि आरओ फिल्टर केलेले पाणी घाला, ज्यामध्ये पोषक तत्वे असतात.
बांबूच्या रोपाची काळजी कशी घ्यावी
- बांबूला दररोज चार-पाच तास सौम्य सूर्यप्रकाशात ठेवा.
- देठ किंवा पानांवर बुरशी दिसल्यास, नुकसान टाळण्यासाठी पुढील बुरशीविरोधी
उपाय करा. - बांबूला २०-२०-२० किंवा १०-१०-१० या प्रमाणात संतुलित NPK खताची आवश्यकता असते, ते द्रव स्वरूपात वापरा.
- जमिनीत उगवणाऱ्या बांबूची दरवर्षी एकदा पुनर्लावणी करणे आवश्यक आहे, परंतु नवीन रोप लावण्यापूर्वी किमान सहा महिने प्रतीक्षा करा.