How to clean burnt cooker bottom: बऱ्याचदा अनेक जण कुकरमध्ये डाळ आणि तांदूळ शिजवतात आणि ते जळतात. कधीकधी ते इतके जळतात की, त्यामुळे कुकर आतून काळा होतो. अशा परिस्थितीत काही जण कुकर पूर्णपणे चकाचक करण्यासाठी रात्रभर कुकरमध्ये पाणी भरून ठेवतात. परंतु, यानंतरही कुकर व्यवस्थित साफ होत नाही. अशावेळी आतून काळा झालेला कुकर स्वच्छ करण्यासाठी महत्त्वाच्या टिप्सकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.
तीन सोप्या पद्धतीने कुकर करा स्वच्छ
बेकिंग सोडा आणि गरम पाण्याचे द्रावण
कुकर स्वच्छ करण्यासाठी तुम्ही बेकिंग सोडा आणि गरम पाण्याचे द्रावण वापरू शकता. त्यामुळे तुम्हाला फक्त गरम पाणी घ्यायचे आहे आणि नंतर त्यात बेकिंग सोडा टाकायचा आहे. दोन्ही मिक्स केल्यानंतर हे द्रावण कुकरच्या आतमध्ये लावा. तुम्ही कुकरच्या वरच्या आणि इतर भागांवरही लावू शकता आणि स्क्रबरच्या मदतीने स्क्रब करून स्वच्छ करू शकता.
कुकर कसा स्वच्छ करावा
कुकर आतून स्वच्छ करण्यासाठी गरम पाण्यात व्हिनेगर मिक्स करून ठेवा. त्यासाठी तुम्हाला फक्त गरम पाणी घ्यायचे आहे आणि त्यात व्हिनेगर टाकायचे आहे आणि कुकरच्या बेसवर जाडसर लेप करायचा आहे. नंतर स्क्रबरच्या मदतीने कुकर स्वच्छ करा. असे केल्याने तुम्ही कुकर सहज स्वच्छ कराल.
हेही वाचा: तुम्ही बनवलेल्या पोळ्या कडक होतात? अहो, मग ‘या’ सोप्या टिप्सने बनवा लुसलुशीत पोळ्या
लिंबाचा रस आणि डिश बार वापरा
लिंबाच्या रसामध्ये सायट्रिक ॲसिडसारखे सक्रिय घटक आणि व्हिटॅमिन-सीसारखे साफ करणारे घटक असतात. त्यामुळे तुम्हाला फक्त लिंबाचा रस घ्यायचा आहे आणि त्यात थोडासा डिश बार टाकायचा आहे. यानंतर हे तुम्हाला फक्त कुकरच्या आतमध्ये लावायचे आहे. काही वेळ राहू द्या आणि नंतर स्क्रबरच्या मदतीने ते स्वच्छ करा.