White Mobile Charger: स्मार्टफोन, लॅपटॉप, टॅब हे सर्व आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनले आहेत, त्यामुळे त्यांच्या सतत वापरामुळे ते सारखे खराब होतात. स्मार्टफोन, टॅब या गोष्टी सहज साफ करता येतात, परंतु बऱ्याचदा लोक फोनचा किंवा लॅपटॉपचा चार्जर साफ करायला विसरतात. त्यामुळे हे चार्जर दिवसेंदिवस खराब होत जातात आणि घाण दिसू लागतात. हे खराब झालेले चार्जर साफ करण्यासाठी काही टिप्स तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरतील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

स्वच्छ पांढऱ्या रंगाचा मोबाइल चार्जर असा करा स्वच्छ

पांढऱ्या रंगाचा मोबाइल चार्जर लवकर घाण होतो. अशा परिस्थितीत फोन तसेच पॉवर बँक, इअरफोन आणि मोबाइल चार्जर आणि त्याची केबल वेळोवेळी स्वच्छ करणे आवश्यक आहे.

चार्जर साफ करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला एक उपाय करायचा आहे, त्यासाठी व्हिनेगर किंवा बेकिंग सोडा वापरून एक पेस्ट तयार करा. सर्वप्रथम एका कपमध्ये तीन ते चार चमचे व्हिनेगर आणि पाणी घालून द्रावण तयार करा. या द्रावणात कापड भिजवून ते पिळून घ्या. आता तुम्ही या कपड्याने चार्जर आणि वायर्स स्वच्छ करू शकता.

हेही वाचा: घनदाट केसांसाठी आणि वजन नियंत्रित ठेवण्यासाठी आवळ्याचा काढा आहे अत्यंत फायदेशीर; जाणून घ्या बनवण्याची योग्य पद्धत

चार्जर साफ करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात?

चार्जर साफ करताना काही खास गोष्टीही लक्षात ठेवाव्यात. चार्जर साफ करण्यापूर्वी तो अनप्लग करा. द्रावणात केबल अजिबात टाकू नका आणि केबलमध्ये पाणी जाणार नाही याचीही काळजी घ्या.