आजकाल सर्वांकडे मोबाईल फोन्स आहेत. एकप्रकारे मोबाईल आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य घटक बनला आहे. याच्यामुळे आपल्या दैनंदिन जीवनातील कित्येक गोष्टी सोप्या झाल्या आहेत. पण या अनोख्या तंत्रज्ञानाचे काही तोटेही आहेत. कामासाठी किंवा करमणुकीसाठी आपण मोबाईलचा सतत वापर करत असल्याने लहान मुलेही फोन पाहिल्यानंतर तो वापरण्याचा हट्ट करू लागतात.

अनेकवेळा पालक इच्छा नसतानाही मुलांच्या हातात मोबाईल देतात, हळूहळू मुलांनाही स्मार्टफोनचे व्यसन जडते आणि ते दिवसभर या गॅजेटला चिकटून राहतात. बऱ्याचदा मुलांना जेवतानाही फोन हवा असतो. फोन न पाहता ते जेवणही सुरू करत नाहीत, हे पाहून पालकांना आपली चूक कळते, पण तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो. परंतु असे काही मार्ग आहेत ज्यांच्या मदतीने तुम्ही मुलांना या व्यसनापासून मुक्त करू शकता.

painkillers, addiction, Pune, Young woman arrested,
पुणे : वेदनाशामक औषधांचा नशेसाठी वापर, तरुणी अटकेत; औषधांच्या १६० बाटल्या जप्त
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
अमरावती : शेअर बाजारात नफ्याचे आमिष; तब्बल २१.९२ लाखांची…
iPhone News
iPhone : अँड्रॉईडऐवजी आयफोन असल्यास टॅक्सी APP बुकिंगचे दर वाढतात का? सोशल मीडियावर काय चर्चा?
How To Get Rid Of Rats In House
घरात उंदरांचा सुळसुळाट वाढत चाललाय? फक्त एका सोप्या उपायाने उंदरांना लावा पळवून
Radish leaves benefits reasons why radish leaves must not be thrown away
महिलांनो तुम्हीही मुळ्याची पानं टाकून देता का? थांबा! ‘हे’ ७ फायदे वाचून कळेल किती मोठी चूक करताय
Apple smart doorbell camera uses Face ID to unlock your door
Apple Smart Doorbell: आता घराचे कुलूप उघडेल चावीशिवाय! ॲपलची नवीन डोअरबेल; चेहरा बघून उघडणार दार
in pune mobile thief dragged youth and bite his hand for mobile at hadapsar area
मोबाइल चोरणाऱ्या चोरट्यांनी पादचारी तरुणाला फरफटत नेले, विरोध करणाऱ्या तरुणाचा हाताचा चावा

पुस्तकांची आवड लावा :

इंटरनेटच्या युगात पुस्तकांपासून दूर राहणे सामान्य झाले आहे. मुलांनाही आजकाल पुस्तके वाचणे आवडत नाही कारण पालकच दिवसभर मोबाईलला चिकटलेले असतात. तुम्ही स्वतः मुलांसमोर पुस्तक वाचायला सुरुवात केली तर मुलंही नक्कल करून पुस्तक वाचू लागतील. जेव्हा ते हे करतील तेव्हा नक्कीच त्यांच्याशी बसून चर्चा करा आणि त्यांच्यात आवड निर्माण करा.

नोकरी आणि मुलांचा सांभाळ करताना तुमचीही दमछाक होते? ‘या’ आहेत मुलांच्या संगोपनाच्या खास टिप्स

निसर्ग प्रेम वाढवा :

तुम्ही मुलांना निसर्गाच्या जितक्या जवळ आणाल तितके ते मोबाईल फोनपासून दूर होतील. आपल्या जीवनात नैसर्गिक गोष्टींचे महत्त्व काय आहे ते त्यांना सांगा. निसर्गाच्या सौंदर्याची ओळख करून देण्यासाठी त्यांना उद्यान, तलाव किंवा हिल स्टेशन अशा ठिकाणी घेऊन जा.

मैदानी खेळ खेळण्यास सांगा :

कोरोना विषाणूच्या साथीनंतर लॉकडाऊनमुळे मुले बराच काळ घरात कैद होती, त्यामुळे त्यांना मोबाईलची सवय झाली होती. या दरम्यान, ऑनलाइन शिक्षणात स्मार्टफोनचा वापर करणे एक सक्ती बनली. यासोबतच मुलांची बाहेर खेळण्याची सवयही सुटली आहे. अशा परिस्थितीत त्यांना मैदानी खेळांसाठी प्रोत्साहन देणे ही पालकांची जबाबदारी आहे, जेणेकरून त्यांचे लक्ष मोबाइलवरून हटवता येईल.

मोबाईलमध्ये पासवर्ड सेट करा

एवढ्या प्रयत्नांनंतरही जर मुल मोबाईल फोन वापरणे टाळत नसेल तर कठोर पावले उचलणे आवश्यक आहे. मुलांना फोन वापरता येणार नाही म्हणून मोबाईलमध्ये पासवर्ड सेट करणे ठीक राहील.

Story img Loader