उन्हाळ्याच्या दिवसात, जेव्हा आपण कडक उन्हात बाहेर पडल्यामुळे त्वचेचे अनेक प्रकारे नुकसान होऊ शकते. सूर्याच्या हानिकारक किरणांमुळे तुमच्या त्वचेचे नुकसान होते. त्यातील सर्वात मोठी समस्या टॅनिंगची आहे, बहुतेक लोकांना ही समस्या उद्भवते. अनेकदा समुद्र किनाऱ्यावर सुट्टी साजरी करून आल्यानंतर या समस्येचा सामना करावा लागतो. त्वचेची टॅनिंग दूर करण्यासाठी तुम्ही रसायनयुक्त उत्पादनांऐवजी घरगुती पदार्थांचा देखील वापरू शकता.
दूध पावडर, लिंबाचा रस आणि मध
मध, दूध पावडर आणि लिंबाचा रस समान प्रमाणात घ्या. सर्व एकत्र करून एकसमान पेस्ट बनवा. २० मिनिटे त्वचेवर राहू द्या. त्यानंतर ताज्या पाण्याने त्वचा धुवा. तुम्ही हे आठवड्यातून दोनदा करू शकता.
तुम्हालाही आहे जेवल्यावर लगेचच पाणी प्यायची सवय? जाणून घ्या या सवयीचे गंभीर तोटे
टोमॅटो फेस पॅक
टॅन काढण्यासाठी टोमॅटो हा खूप चांगला घटक आहे. एक टोमॅटो घ्या आणि त्याची पेस्ट बनवा. ते गाळून उरलेला लगदा चेहऱ्यावर लावा. २० मिनिटे त्वचेवर राहू द्या. त्यानंतर त्वचा पाण्याने धुवा आणि मॉइश्चरायझ करा. तुम्ही हे आठवड्यातून दोनदा करू शकता.
बेसन, दही आणि हळद
हा फेस पॅक बनवण्यासाठी एका भांड्यात एक मोठा चमचा बेसन घ्या. आता एक चमचा दही घ्या. चिमूटभर हळद घ्या. हे सर्व एकत्र करून पेस्ट बनवा. २० मिनिटे त्वचेवर राहू द्या. त्यानंतर त्वचा धुवून मॉइश्चरायझ करा. तुम्ही ते आठवड्यातून एकदा किंवा दोनदा करू शकता. हा फेस पॅक टॅन काढण्यासाठी प्रभावीपणे काम करतो.
तुमच्या आवडत्या परफ्यूमची Expiry Date निघून गेलीय? ‘या’ पद्धतीने करता येईल पुन्हा वापर
कोरफड, हळद आणि मध
हा फेस पॅक बनवण्यासाठी एका कोरफडीच्या पानाचा गर घ्या. त्यात हळद घालून मिक्स करून पेस्ट बनवा. १५ मिनिटे त्वचेवर राहू द्या. त्यानंतर त्वचेला मॉइश्चरायझ करा. तुम्ही हे आठवड्यातून दोनदा करू शकता.
कॉफी, दही आणि हळद
यासाठी एक चमचा कॉफी घ्या, एक चमचा हळद घ्या. सातत्य राखण्यासाठी पुरेसे दही घ्या. हे सर्व साहित्य एकत्र करून पेस्ट बनवा. २० मिनिटे त्वचेवर राहू द्या. त्यानंतर त्वचा धुवून मॉइश्चरायझ करा.
(येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)