टेलिकॉम कंपन्यांनी टॅरिफ दरवाढ केल्यामुळे अनेक ग्राहक नाराज आहेत. ज्या डेटासाठी ग्राहकांना आधी खूप कमी पैसे खर्च करावे लागत होते त्यासाठी आता त्यांना आता अधिक पैसे मोजावे लागतायेत. आधीएवढ्याच सुविधांसाठी ग्राहकांना आता जवळपास दीडपट पैसे मोजावे लागत आहेत. परिणामी अनेक ग्राहक नवा आणि परवडणारा पर्याय शोधत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आणखी वाचा – Airtel चे तीन शानदार प्लॅन , अनलिमिटेड कॉलिंगसह दररोज 2GB पर्यंत डेटा

काही जणांनी मोबाइल नंबर पोर्ट केलाय, तर काहींनी प्लॅन बदलला आहे. पण पोस्टपेड युजर्सना याचा काहीच फटका बसलेला नाही. कारण पोस्टपेड टॅरिफ वाढ अद्याप केलेली नाहीये. याचमुळे अनेक युजर्स प्रीपेड सोडून पोस्टपेडमध्ये शिफ्ट होत आहेत. Airtel च्या वेबसाइटवर उपलब्ध आकडेवारीनुसार, 18 डिसेंबरपर्यंत गेल्या सात दिवसांमध्ये जवळपास 20 हजार Postpaid कनेक्शन ऑनलाइन जोडले गेलेत. त्यामुळे येथे आम्ही तुम्हाला काही अशी फायद्यांबाबत सांगणार आहोत जे Prepaid युजर्सना मिळत नाहीत.

आणखी वाचा – टेलिकॉम कंपन्यांचे ₹50 पेक्षा कमी किंमतीचे ‘बेस्ट डेटा प्लॅन्स’

डेली डेटा लिमिट नाही :
प्रीपेड आणि पोस्टपेड दोन्ही प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग मिळते. पण, पोस्टपेड प्लॅनमधील सर्वाधिक फायदा म्हणजे यामध्ये कोणत्याही प्रकारे डेली डेटा लिमिट नाहीये. एअरटेलच्या अधिकांश प्रीपेड प्लॅनमध्ये 1जीबी, 1.5जीबी किंवा 2 जीबी डेटा दररोज मिळतो. याचा थेट अर्थ म्हणजे अनेकदा एखादा सिनेमा किंवा व्हिडिओ पाहतानाच डेटा संपू शकतो आणि तुम्हाला दुसऱ्या दिवसाची वाट पाहावी लागते. पण पोस्टपेड प्लॅनमध्ये असं काही होत नाही. एअरटेलच्या सर्वात स्वस्त 499 रुपये दरमहिना या प्लॅनमध्ये 75जीबी डेटा मिळतो, म्हणजे एका दिवसाच्या हिशेबाने 2.5 जीबी डेटा मिळतो.

आणखी वाचा – Airtel, Vodafone-Idea च्या ग्राहकांसाठी ‘बॅड न्यूज’, नाही बदलला ‘हा’ नियम

अन्य फायदे –
एअरटेलच्या पोस्टपेड प्लॅनमध्ये एंटरटेनमेंटशी निगडीत अन्य अनेक फायदे मिळतात. यामध्ये ग्राहकांना नेटफ्लिक्स, अॅमझॉन प्राइम आणि ZEE5 चं सब्सक्रिप्शन मिळतं. 499 रुपये आणि अन्य पोस्टपेड प्लॅनमध्ये Netflix तीन महीने आणि अॅमेझॉन प्राइम व ZEE5 यांचं एक वर्षासाठी सब्सक्रिप्शन मिळतं. या सर्व सुविधांसाठी प्रीपेड ग्राहकांना जवळपास 3000 रुपये मोजावे लागतात.