एका मुलीसाठी आपले करिअर निवडणे जितके आव्हानात्मक आहे तितकेच ते पुढे चालू ठेवणंही कठीण आहे. हेच कारण आहे की बहुतेक स्त्रिया त्यांच्या कामाच्या कारकिर्दीत दोन महत्त्वाच्या टप्प्यांतून जातात, एक लग्नापूर्वीचा टप्पा आणि दुसरा लग्न आणि मुलांच्या जन्मानंतरचा टप्पा. वर्ल्ड बँकेच्या आकडेवारीनुसार, २००५ साली भारतामध्ये महिला कामगार सहभाग (Female Labor Participation) २६% होता, जे २०१९ सालाअखेरीस २०.३% इतका खाली आला.
वास्तविकतः लग्न आणि मुले या दोन गोष्टी नोकरदार महिलांच्या जीवनात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. लग्नानंतर घराची जबाबदारी सांभाळून कुटुंबाला पुढे नेण्यासाठी मुलाला जन्म द्यावा लागतो. या दोन्हीही परिस्थितींमध्ये महिलांना आपल्या करिअरमध्ये थोडे थांबावे लागते. यानंतर त्या पुनरागमन करू शकत नाहीत असे नाही. परंतु हे पुनरागमन खडतर आव्हानांनी भरलेले असते.
अनेक वर्षांच्या सहवासानंतरही ‘या’ कारणामुळे विभक्त होतात पतिपत्नी; लगेचच स्वभावात करा सुधारणा
बहुतेक स्त्रियांसाठी, कुटुंब आणि मुलांसोबत बराच वेळ घालवल्यानंतर त्यांच्या नोकरीवर परतणे हे अपराधीपणाने भरलेले असते. मात्र अशा प्रतिकूल परिस्थितीतही काही महिला कामावर परतल्या आहेत.
कामावर परतणे का असते कठीण?
याबाबत व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट श्वेता बांख्रू यांनी सांगितले, ‘लग्नानंतर मी माझ्या पत्रकारितेची नोकरी सोडली. नंतर व्हॉइस ओव्हरचे स्टुडिओ सुरु केले. परंतु २०१९ साली मुलगी झाल्यानंतर माझं आयुष्य थांबलं.’ त्यांनी पुढे सांगितलं, ‘मी शारीरिकदृष्ट्या खूप कमकुवत झाले होते आणि आवाजाचे काम करण्यासाठी खूप ताकद लागते, जी मी परत आणू शकत नव्हते. त्यातही घर सांभाळणे, मुलीला सांभाळणे होतेच. कधीकधी सगळ्या प्रकल्पांना नाही म्हणावेसे वाटायचे.’
Pregnancy Tips : करोना काळात प्रेग्नन्सी प्लॅन करताय? तर ‘या’ गोष्टींची नक्की काळजी घ्या
स्वयंप्रेरणा आवश्यक
त्यांनी सांगितले, ‘मुलीला सांभाळताना आणि घरी राहताना मलाही कम्फर्ट झोन जाणवू लागला. स्वयंप्रेरणा आणि नवऱ्याच्या प्रोत्साहनामुळे पुन्हा काम सुरु केले. परंतु हे माझ्यासाठी मानसिकदृष्ट्या आव्हानात्मक होते. आई झाल्यानंतर पुन्हा काम सुरु करणे सोपे नसते. परंतु आपल्याला स्वतःच स्वतःसाठी मार्ग तयार करावे लागतील. तेव्हाच तुम्ही तुमचे स्वप्न पूर्ण करू शकता. कारण वर्किंग मदरच दुसऱ्या पिढीला वर्किंग बनवते.’