पावसाळ्यामध्ये आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती कमी असते, यामुळे थोड्याशा निष्काळजीपणामुळेही आपल्याला धोकादायक आजार होऊ शकतो. मान्सून म्हणजे आनंददायी ऋतू असतो, परंतु डेंग्यू, मलेरिया आणि बर्याच मौसमी आजारांचा प्रसार आणि मोठ्या संख्येने पसरत असतो. अशा परिस्थितीत या हंगामात स्वत:ला आणि कुटुंबाला निरोगी ठेवणे एक आव्हान असते. एकीकडे, देशभरात करोनाच्या साथीच्या विळख्यात आपण सापडलो आहोत. अशा परिस्थितीत, आपण किंवा आपल्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळून आली तर चिंतेची स्थिती निर्माण होऊ शकते. म्हणूनच, या हंगामात आपल्या अन्न आणि राहण्याच्या सवयीची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. खरं तर, या मान्सून मध्ये थोडा निष्काळजीपणा झाल्यास आपण कोणत्यातरी जीवाणूचा बळी ठरू शकतो. चला तर मग जाणून घेऊयात मान्सूनच्या आजारांना बळी न पडता निरोगी राहण्यासाठी काय करायला हवं.
पावसाळ्याच्या दिवसात या गोष्टींकडे दुर्लक्ष केलात तर पडाल आजारी
पावसाळयाच्या दिवसात आरोग्याची काळजी घेणे खूप महत्वाचा आहे. अनेक आजरांपासून वाचण्यासाठी निरोगी राहण्यासाठी या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका.
Written by लोकसत्ता ऑनलाइन
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 18-06-2021 at 15:33 IST
मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: It is very important to take care of health on rainy days scsm