kitchen iteams cause of cancer: कॅन्सर अर्थात कर्करोग आजही जगासमोरील एक जीवघेणी समस्या आहे. हजारो लोक दरवर्षी कर्करोगामुळे मृत्यू पावतात. पहिल्यांदा जेव्हा कर्करोगाचा जगाशी सामना झाला तेव्हा एक समज निर्माण झाला की जे धुम्रपान करतात त्यांनाच कर्करोग होतो किंवा तंबाखू खाल्ल्यानेच कर्करोग होतो. पण हळूहळू पोटाचा कर्करोग, स्तनांचा कर्करोग आणि अन्य कर्करोग जगासमोर उलगडू लागले आणि हे सत्य समोर आले की कर्करोग कोणालाही आणि कसाही होऊ शकतो आणि तेव्हापासून कर्करोगाची जास्त भीती निर्माण झाली. अशातच आता स्वयंपाकघरातील काही वस्तुंमुळेही कर्करोगाचा धोका निर्माण होऊ शकतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आपल्या स्वयंपाकघरात काही अशा गोष्टी असतात ज्याच्या वापराने आपल्याला कॅन्सर होण्याचा धोका असतो. त्यामुळे किचनमध्ये असणाऱ्या काही गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक जण जे अधिक सोईस्कर आहे त्याचा वापर करतात. परंतु त्या गोष्टी आपल्या आरोग्यासाठी कितपत योग्य आणि अयोग्य आहेत याची अनेकांना माहिती नसते. त्यामुळे स्वयंपाकघरातील अशा गोष्टींमुळे कॅन्सरसारखा मोठा गंभीर आजार होण्याचा धोका असतो.

अनेकांना माहीत नसलेल्या, स्वयंपाकघरात आढळणाऱ्या सामान्य वस्तूंचा कर्करोगाशी संबंध असू शकतो.कॅन्सर निर्माण करणारे काही घटक सामान्यतः स्वयंपाकघरात आढळतात. ते कोणते हे जाणून घेऊयात.

नॉनस्टिक भांडी

स्वयंपाकघर मॉड्युलर होत असल्याने येथे वापरण्यात येणारी भांडीही नॉनस्टिक होत आहेत. यामध्ये, स्वयंपाक आणि त्यानंतरची साफसफाई करणे देखील सोपे आहे. स्वयंपाकासाठी तेलही कमी लागते. नॉनस्टिकचेही अनेक तोटे आहेत. याचा वाईट परिणाम हळूहळू तुमच्या आरोग्यावर होत आहे. पीएफओए नावाच्या कार्सिनोजेनिक रसायनापासून नॉन-स्टिक भांडी बनवली जातात. प्रत्येक वेळी ही भांडी गरम केल्यावर ते एक विषारी वास सोडतात ज्यामुळे तुम्ही आजारी पडता. जर तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील सदस्य पुन्हा पुन्हा एखाद्या संसर्गाला बळी पडत असाल, तर नॉन-स्टिक भांडी हे त्याचे कारण असू शकते. नॉन-स्टिक कुकवेअर विषारी धूर सोडू शकतात, ज्यामुळे फ्लू सारखी लक्षणे उद्भवतात आणि काही प्रकरणांमध्ये, कर्करोगाची चिंता वाढवते. म्हणजेच स्वयंपाकघरातील तुमचा सर्वात चांगला मित्र हा तुमच्या आरोग्याचा सर्वात मोठा शत्रू आहे.

प्लास्टिकची भांडी : हिस्टोपॅथॉलॉजी – ऑनकक्वेस्ट लॅबोरेटरीज वरिष्ठ सल्लागार आणि एचओडी, डॉ. भावना बन्सल, यांच्या मते, स्वयंपाकघरातील प्लास्टिकची भांडी आरोग्यासाठी धोकादायक ठरु शकतात.

प्लास्टिकची बाटली : प्लास्टिकच्या बाटलीच्या नियमीत वापराने रोगप्रतिकारशक्ती आणि हार्मोन्स प्रभावित होत असतात. लठ्ठपणा वाढण्याची शक्यता असते. प्लास्टिकच्या डब्यात जेवण गरम केल्याने जे टॉक्सिन्स बाहेर पडतात त्यामुळे इंन्सुलिनचे प्रमाण वाढते. त्यामुळे कॅन्सर होण्याची शक्यता वाढते.

अॅल्युमिनियमची भांडी : आजकाल स्वयंपाकघरात अॅल्युमिनियमची भांडी लोकं वापरताना दिसतात. पण हीच भांडी तुमच्यासाठी घातक ठरतात. कारण अॅल्युमिनियमच्या भांड्यातील अॅल्युमिनियम हळूहळू संपत जातो आणि तो अन्नाद्वारे आपल्या शरीरात पोहोचतो, त्यामुळे आपल्या शरीरात विष पसरते. तर अॅल्युमिनियमचे कण हे आपल्या शरीरात जमा झाल्यानंतर कर्करोगाचा धोका निर्माण होता. तसंच अॅल्युमिनियमच्या भांड्यांमध्ये तुम्ही अन्न बनवत असाल तर त्याचा तुमच्या किडनीवर परिणाम होता.

अॅल्युमिनियम फॉइल : बहुतेक लोक अन्न जास्तवेळ गरम राहण्यासाठी अॅल्युमिनियम फॉइलचा वापर करतात. पण हेच अॅल्युमिनियम फॉइल तुमच्यासाठी हानिकारक ठरते. कारण अॅल्युमिनियम फॉइलमध्ये असलेले अॅल्युमिनियम अन्नाद्वारे आपल्या पोटात जाते. ते पोटात गेल्यामुळे आपल्या शरीराला झिंक नीट शोषूण घेता येत नाही. त्यामुळे कर्करोगाचा धोका निर्माण होतो. त्यामुळे अॅल्युमिनियम फॉइलचा वापर करू नका.
प्रक्रिया केलेले मांस