Jackfruit side effects फणसाची भाजी खायला अतिशय चविष्ट आणि पौष्टिक असते. पिकलेले फणसही लोक आवडीने खातात. यामध्ये पोटॅशियम, लोह, कॅल्शियम, झिंक, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात आढळतात, जे आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. पण तुम्हाला माहित आहे का की फणस खाल्ल्यानंतर काही गोष्टी खाणे टाळले पाहिजे. फणस खाल्ल्यानंतर काही विशिष्ठ पदार्थ खाल्ल्यास शरीरावर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. चला तर मग जाणून घेऊया फणस खाल्ल्यानंतर कोणत्या गोष्टी खाऊ नये आणि त्याचे दुष्परिणाम काय होऊ शकतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पपई

फणस खाल्ल्यानंतर पपई खाणे टाळावे. ऑक्सलेट नावाचे रासायनिक संयुग फणसात आढळते. हे कॅल्शियमची शोषण क्षमता कमी करते ज्यामुळे हाडांचं नुकसान होऊ शकते. त्यामुळे फणस खाल्ल्यानंतर २-३ तासांनी पपई खावी.

पान

अनेकांना जेवणानंतर सुपारी खायची सवय असते. सुपारी खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते, पण फणस खाल्ल्यानंतर लगेच सुपारी खाल्ल्याने आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. फणस खाल्ल्यानंतर किमान २-३ तास अंतर ठेवून मग सुपारी खावी.

भेंडी

फणसाच्या भाजीसोबत भेंडी खाणे तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते. कारण भेंडी आणि फणस हे दोन्ही एकत्र खाल्ल्यामुळे त्वचेशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. यामुळे त्वचेची जळजळ, खाज आणि पुरळ यासारख्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे फणस खाल्ल्यानंतर भेंडी खाऊ नये.

दूध

फणस खाल्ल्यानंतर दूध पिणे टाळावे. असे केल्याने त्वचेवर पांढरे डाग आणि इतर समस्या उद्भवू शकतात. त्याचे कारण असे आहे की, फणसामध्ये असलेले ऑक्सलेट्स दुधामध्ये मिसळल्यावर त्याचा विरुद्ध पदार्थ तयार होतो. त्यामुळे आपल्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे फणस खाल्ल्यानंतर कधीही दूध पिऊ नये.

हेही वाचा >> हिरवी मिरची की लाल मिरची? वजन कमी करण्याबरोबरच आरोग्यासाठी कोणती मिरची फायदेशीर

या लेखात दिलेली माहिती सामान्य माहितीच्या आधारावर देण्यात आली आहे. कोणताही उपाय करून पाहण्याआधी संबंधित आरोग्य तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jackfruit side effects after eating jackfruit do not eat these things even by mistake it may be heavy srk
Show comments