जॅग्‍वार लँड रोव्‍हर इंडियाने आज भारतामध्‍ये नवीन रेंज रोव्‍हर इवोकच्‍या डिलिव्‍हरीजना सुरूवात केल्‍याची घोषणा केली आहे. नवीन इवोक इंजेनिअम २.० लिटर पेट्रोलवर आर-डायनॅमिक एसई ट्रिममध्‍ये, तसेच २.० लिटर डिझेल पॉवरट्रेनवर एस ट्रिममध्‍ये उपलब्‍ध आहे. २.० लिटर पेट्रोल इंजिन १८४ केडब्‍ल्‍यू शक्‍ती व ३६५ एनएम टॉर्क देते आणि २.० लिटर डिझेल इंजिन १५० केडब्‍ल्‍यू शक्‍ती व ४३० एनएम टॉर्क देते. नवीन रेंज रोव्‍हर इवोकची किंमत भारतामध्‍ये एक्‍स-शोरूम ६४.१२ लाख रूपयांपासून सुरू होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नवीन रेंज रोव्‍हर इवोकची आकर्षक वैशिष्‍ट्ये

  • नवीन रेंज रोव्‍हर इवोकमध्‍ये प्रतिष्ठित रेंज रोव्‍हर लक्‍झरीसह अत्‍याधुनिक डिझाइन व सुधारित इंटिरिअर, तसेच अत्‍याधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश.
  • नवीन इवोकमध्‍ये नेक्‍स्‍ट-जनरेशन फोर-सिलिंडर इंजेनिअम डिझेल इंजिनसोबत २.० लिटर इंजेनिअम पेट्रोल इंजिन ऑन-रोड परफॉर्मन्‍स देतात.
  • ३ डी सराऊंड कॅमेरा, केबिन एअर आयोनायझेशनसह पीएम २.५ फिल्‍टर आणि वायरलेस डिवाईस चार्जिंगसह फोन सिग्‍नल बूस्‍टर गाडीमध्ये बसवण्यात आले आहेत.
  • लँड रोव्‍हरची सर्वात प्रगत इन्‍फोटेन्‍मेंट सिस्टिम ‘पीव्‍ही’ आता रेंज रोव्‍हर इवोकमध्‍ये उपलब्‍ध आहे.
  • नवीन ड्युअल टोन इंटीरिअर रंगसंगती डीप गार्नेट / इबोनी पहिल्‍यांदाच रेंज रोव्‍हर इवोकमध्‍ये सादर करण्‍यात आली आहे.

लँड रोव्‍हर प्रोडक्‍ट पोर्टफोलिओ

लँड रोव्‍हरच्‍या भारतातील रेंजमध्‍ये न्‍यू रेंज रोव्‍हर इवोकची किंमत ६४.१२ लाख रूपयांपासून पुढे, डिस्‍कव्‍हरी स्‍पोर्टची किंमत ६५.३० लाख रूपयांपासून पुढे, रेंज रोव्‍हर वेलार Range Rover Velar ची किंमत ७९.८७ लाख रूपयांपासून पुढे, डिफेण्‍डर ११० ची किंमत ८३.३८ लाख रूपयांपासून पुढे, रेंज रोव्‍हर स्‍पोर्टची किंमत ९१.२७ लाख रूपयांपासून पुढे आणि रेंज रोव्‍हरची किंमत २ कोटी १० लाख रूपयांपासून पुढे आहे. नमूद केलेल्या सर्व किंमती या भारतातील एक्‍स-शोरूम किंमती आहेत.

भारतातील जॅग्वार लँड रोव्‍हर रिटेलर नेटवर्क

जग्वार लँड रोव्‍हर वाहने भारतात अहमदाबाद, औरंगाबाद, बेंगळुरू, भुवनेश्‍वर, चंदीगड, चेन्‍नई , कोइंम्बतूर, दिल्ली, गुरगाव, हैद्राबाद, इंदौर, जयपूर, कोलकाता, कोची, कर्नाल, लखनौ, लुधियाना, मंगलोर, मुंबई, नोएडा, पुणे, रायपूर, सुरत आणि विजयवाडा या २४ शहरांमधील २८ अधिकृत आउटलेट्समध्ये उपलब्ध आहेत.