सोप्या गोष्टींनी भरपूर फायदे देणाऱ्या DIY च्या शोधात सगळेच असतात. मग तुमच्या स्वयंपाकघरात असणाऱ्या या पदार्थाबद्दल तुम्ही नक्कीच जाणून घ्या. तो पदार्थ म्हणजे जायफळ. आहारतज्ज्ञ लिमा महाजन जायफळाच्या विविध गुणधर्मांबद्दल सांगताना म्हणाल्या, “एक चिमूटभर जायफळ तुमच्या त्वचेच्या समस्यांपासून ते कमी झालेल्या लैंगिक इच्छेपर्यंत अशा अनेक समस्या दूर करू शकते.”त्यांच्या माहितीनुसार, जायफळ हे त्वचेसाठी अत्यंत गुणकारी मानले जाते. जायफळामध्ये असलेले घटक हे त्वचेला निरोगी व मुलायम ठेवण्यास उपयोगी ठरते. यासोबतच, चेहेऱ्यावरील मुरुमं, डाग यांसारख्या समस्यांवर हे एक उत्तम औषध आहे.
गुरुग्राममधील आर्टेमिस्ट हॉस्पिटलच्या क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट, शबाना परवीन इंडियन एक्स्प्रेस डॉट कॉमला सांगताना म्हणाल्या की, जायफळात अँटिमायक्रोबायल (antimicrobial) आणि अँटी- इंफ्लेमेटरी (anti-inflammatory) गुणधर्म असल्याने चेहऱ्यावर येणाऱ्या मुरमांपासून, डागांपासून त्वचेचं रक्षण करण्यास मदत होते. त्याचसोबत हार्मोन्स रेग्युलेट करते, पचनास मदत करते व निद्रानाशाचा त्रासदेखील दूर करण्यास मदत करते.
हेही वाचा : सावधान! फणस खाल्ल्यानंतर चुकूनही खाऊ नका ‘हे’ पदार्थ; आरोग्यावर होऊ शकतो वाईट परिणाम
नवी मुंबई येथील धीरूभाई कोकिलाबेन अंबानी हॉस्पिटलमधील सल्लागार आहारतज्ज्ञ प्रतीक्षा कदम सांगतात की, जायफळामध्ये ए, सी आणि ई खनिजांसोबत मँगॅनीज, मॅग्नेशिअम, लोह, झिंक इत्यादींसारखे गुणधर्म असल्याने पचन व्यवस्था सुधारण्यात मदत करते आणि रक्तातील साखरेचे प्रमाणदेखील नियंत्रित ठेवते.तरीही यावर फारसा अभ्यास झाला नसल्याने याचा खरंच फायदा होत असल्याचा ठोस पुरावा नाही, असं डॉक्टर परवीन म्हणतात.
जायफळाचा वापर कसा करावा?
चिमूटभर जायफळ
एक चमचा दही
अर्धा चमचा मध
१. चिमूटभर जायफळ हे एक चमचा दही व अर्धा चमचा मध यामध्ये मिसळावे.
२. हे मिश्रण चेहऱ्याला १५ मिनिटे लावून ठेवावे.
३. १५ मिनिटांनंतर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवावा.
चिमूटभर जायफळ एक ग्लास दुधात मिसळून प्यायल्याने झोपदेखील सुधारते.
परंतु, जायफळाचा उपयोग करताना या गोष्टींकडे दुर्लक्ष देऊन चालणार नाही. जायफळाचा वापर हा गर्भवती महिलांसाठी धोक्याचा ठरू शकतो, त्याचसोबत कुणाला पोटाचे विकार, अल्सर यांसारख्या समस्या असल्यास त्यांनी याचा वापर करू नये किंवा वापर करताना सावधगिरी बाळगावी. १२० मिलिग्रॅमपेक्षा जास्त वापर हा त्रासदायक ठरू शकतो. म्हणून जायफळ वापरताना या गोष्टीची काळजी घ्यायला विसरू नका