Janmashtami 2022 Recipes: आज देशभरात कृष्णजन्माष्टमीचा उत्साह पाहायला मिळत आहे. मथुरा वृंदावन सह जगभरातील कृष्णभक्तांसाठी आजचा दिवस म्हणजेच श्रावण कृष्ण पक्ष अष्टमी अत्यंत खास असते. यादिवशी कान्हाला आवडत्या गोष्टींचा नैवेद्य दाखवला जातो. यापैकी एक म्हणजे पंचामृत. कान्हाला दही दुधाची आवड आहे हे तर सगळ्यांनाच ठाऊक आहे, हे व अन्य सर्व आवडीचे पदार्थ एकत्र करून गोकुळाष्टमीला पंचामृताचा नैवेद्य दाखवण्याची परंपरा आहे. पंचामृतासह जन्माष्टमीला खास सुंठवडा प्रसाद म्हणून दिला जातो.

पावसाळ्याच्या दिवसात आरोग्यासाठी चांगले असे हे पदार्थ निदान नैवेद्याच्या रूपात तरी खाल्ले जावेत म्हणून जन्माष्टमी पूजेत सुंठवड्याचा आवर्जून समावेश केला जातो. आज तुम्ही सुद्धा कृष्णाच्या आवडीचे पंचामृत व सुंठवडा बनवून तुमची पूजा संपन्न करू शकता. हे पदार्थ पारंपरिक पद्धतीने कसे बनवावे हे जाणून घेऊयात.

Morya Gosavi Sanjeev Samadhi Festival begins in chinchwad Pune news
पिंपरी: मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सवाला मंगळवारपासून प्रारंभ; सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची उपस्थितीती
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
yuva sena protests after attempt to remove place of worship for liquor shop
मद्य दुकानासाठी प्रार्थनास्थळ हटविण्याचा प्रयत्न, युवासेनेची निदर्शने
Anganewadi Bharadi Devi Jatra celebrations with traditional rituals and vibrant festivities.
Anganewadi Jatra : देवीने कौल दिला अन् ठरली आंगणेवाडीच्या जत्रेची तारीख, ‘या’ दिवशी सुरू होणार उत्सव
Announcements of organic natural farming Know how much the use of urea and other fertilizers has increased Mumbai news
सेंद्रीय, नैसर्गिक शेतीच्या फक्त घोषणाच; जाणून घ्या, युरियासह अन्य खतांचा वापर किती वाढला
How To Make Methi Paratha
Methi Paratha Recipe : मेथीचे बनवा मऊसूत पराठे! हिवाळ्यात नाश्त्यासाठी, मुलांच्या डब्यासाठी बेस्ट रेसिपी
Gondia known as Maharashtra s granary sees farmers shifting towards maize and gram this rabi season
धानाचे कोठार, पण शेतकऱ्यांचा कल मका, हरभऱ्याकडे
Target of purchasing 33 lakh quintals of paddy in tribal areas
आदिवासी क्षेत्रात ३३ लाख क्विंटल धान खरेदीचे उद्दिष्ट

पंचामृत

पंचामृतासाठी लागणारे साहित्य

  • दही, मध, तुळशीची पाने, दूध, चारोळी, नारळ पावडर, सुखा मेवा, मखाना आणि तूप

पंचामृताची कृती

पंचामृताचे फायदे

  • पंचामृत हे केसाच्या वाढीसाठी पोषक आहे तसेच स्मरणशक्ती वाढवणे, पित्तावर संतुलन ठेवणे पचनक्रिया सुधारणे यामध्ये पंचामृत गुणकारी ठरते.
  • याशिवाय जर आपल्याला वारंवार पिंपल, पुरळ असे त्रास सतावत असतील तर पंचामृताचे सेवन स्किनच्या पेशींच्या विकासासाठी मदत करते ज्यामुळे त्वचेवर तजेला येतो.

Krishna Janmashtami 2022 Bhajan: गोकुळाष्टमी विशेष ‘ही’ भजने, गवळणी, व मराठी गाणी ऐकून साजरा करा कृष्ण जन्म

सुंठवडा

सुंठवडासाठी लागणारे साहित्य

  • बारीक वाटून घेतलेली साखर, खारीक, गूळ पावडर, शुद्ध तूप, किसलेले खोबरे, खसखस, भाजलेले मेथीदाणे, डिंक, काजू-बदामाचे तुकडे, सुंठ पावडर.

सुंठवडा कृती

सुंठवड्याचे फायदे

  • कंबरदुखी, आमवात, संधीवात, मासिक पाळीच्या वेळेस होणारी पोटदुखी यासाठी सुंठवडा खूपच गुणकारी ठरतो. मात्र जर का आपल्याला पित्ताचा त्रास असेल तर सुंठ साजूक तुपासोबत खावे.साजूक तूप व सुंठ संधिवातावर उत्तम उपाय ठरतो.

Janmashtami 2022: गोकुळाष्टमी विशेष आंबोळ्या करताना वापरा या ट्रिक्स; पीठ आंबवण्याची चिंता सोडा

भगवान श्रीकृष्ण हा विष्णूचा आठवा अवतार असल्याचे मानले जाते, अष्टमीच्या मध्यरात्री 12 वाजता श्रीकृष्णाचा जन्म मथुरेत झाला होता, यानंतर कंसापासून रक्षण करण्यासाठी पिता वासुदेवाने त्याला नंदाच्या घरी गोकुळात पोहचवले.

दरम्यान, यंदा तिथीनुसार जन्माष्टमीच्या तारखेत थोडा गोंधळ होता. १८ कि १९ ऑगस्ट नेमकी जन्माष्टमी कधी साजरी करायची असा प्रश्न अनेकांना पडला होता. मात्र पंचांगानुसार १८ ऑगस्टला मध्यरात्री कृष्णजन्म तिथीनंतर जन्माष्टमी तर १९ ऑगस्टला दहीहंडी साजरी केली जाणार आहे.

Story img Loader