Hibiscus flower Tips: आपल्या बाल्कनीची शोभा वाढविण्यासाठी आपण विविध प्रकारची रोपं लावतो आणि मग ती रोपं चांगल्या रीतीनं बहरावीत यासाठी रोज काही ना काही उपाय करीत असतो. पण, तुम्ही हे काम जर योग्य पद्धतीनं केले नसेल, तर या मेहनतीचा फार काही उपयोग होतोच असं नाही. विशेषतः फुलझाडांसाठी महागड्या खतांची गरज नसते; तर तुम्ही अगदी घरगुती पद्धतीनेसुद्धा खत तयार करून रोपांना बहर आणू शकता.

जास्वंदच्या झाडाच्या वाढीसाठी आणि भरपूर कळ्या फुले येण्यासाठी घरातल्या दोन वस्तूंचा वापर करून खत कसं तयार करायचं ते पाहणार आहोत. हिवाळ्यामध्ये जास्वंदच्या झाडाची काळजी कशी घ्यायची, त्याचबरोबर जास्वंदच्या झाडाला कीड लागते तर त्यासाठी कोणती कीटकनाशके फवारायची, याचीदेखील माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.

Crispy Butterfly Samosa Recipe
‘बटरफ्लाय समोसा रेसिपी’, नाव ऐकूनच तोंडाला सुटलं ना पाणी, लगेच वाचा साहित्य आणि कृती
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
Maharashtra grape cultivation
पाच वर्षांत पन्नास हजार एकर द्राक्ष लागवड क्षेत्रात घट, उत्पादन खर्च वाढल्याने अन्य पिकांकडे कल
Solapur jowar crops loksatta news
सोलापूर : ज्वारीच्या कोठारात यंदा ज्वारीचा पेरा निम्म्यावर, लांबलेल्या पावसाचा परिणाम
Grape
राज्यात ५० हजार एकर द्राक्षबागेवर कुऱ्हाड ? जाणून घ्या, नोटबंदी, कोरोना टाळेबंदी, नैसर्गिक आपत्तींचा परिणाम
Winter special recipe in marathi Eat sweet and sour tomato chutney with jaggery to stay healthy during winters
हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी खा गुळ-टोमॅटोची चटणी; रेसिपी आहे एकदम सोपी
Annual flower exhibition detail update
निसर्गलिपी : फुलांच्या वार्षिक प्रदर्शनांना जाच!
clean up marshal action against those responsible for littering
क्लीन अप मार्शलकडून अस्वच्छता करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा; पालिकेच्या तिजोरीत आठ महिन्यांत ३ कोटी दंड जमा

हेही वाचा… तुम्ही तुमची बेडशीट महिन्यातून किती वेळा धुता? जाणून घ्या स्वच्छ करण्याच्या ‘या’ सोप्या टिप्स

कुंडीमध्ये लावलेल्या जास्वंदाच्या झाडाला कळ्याफुले येण्यासाठी वेळोवेळी खत टाकणे आवश्यक असते; पण त्याचबरोबर झाडाला भरपूर सूर्यप्रकाश मिळेल याचीही काळजी तुम्हाला घ्यावी लागेल. आता हिवाळ्यामध्ये सकाळच्या आणि संध्याकाळच्या वेळी धुके पडते, म्हणून झाडाच्या पानांमध्ये ओलावा राहतो आणि ओलावा राहिल्यामुळे झाडाच्या पानांवर कीड लागत राहते. त्यामुळे आपण आज ज्या कीटकनाशकाचा वापर करणार आहोत, ते म्हणजे राखेपासून तयार केलेले पाणी.

कसे तयार कराल खत?

खत तयार करण्यासाठी एक लीटर पाण्यामध्ये एक चमचा राख व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. राख ही कीटकनाशक म्हणून जसे काम करते, तसेच याचा खत म्हणूनदेखील चांगला फायदा होतो. राखेपासून पाणी तयार केल्यानंतर ते एका गाळणीच्या किंवा कापडाच्या साहाय्याने गाळून घ्यायचं, त्यामुळे यातील कण स्प्रे बॉटलमध्ये अडकणार नाहीत. गाळून घेतलेलं पाणी स्प्रे बॉटलमध्ये भरायचं आणि त्याचा स्प्रे संपूर्ण झाडावर करायचा. याचा फवारा केला तर झाडावर कीड लागणार नाही आणि लागली असेल तर ती निघून जाते. अशाप्रकारे झाडावर महिन्यातून एकदा कोणतंही कीटकनाशक फवारणं आवश्यक असतं. जर तसं केलं नाही तर झाडावर कीड लागून त्याची वाढ होत नाहीच, पण झाडावर फुले कमी प्रमाणात येतात.

केळीचे साल

आता झाडाला भरपूर फुले येण्यासाठी आपण ज्या दोन वस्तूंचा वापर करणार आहोत, त्यातली पहिली वस्तू म्हणजे सुकलेल्या केळीच्या सालीचे तुकडे. झाडांना फुले येण्यासाठी जी पोषक तत्त्वे आवश्यक आहेत ती सर्व केळीच्या सालीमध्ये असतात. म्हणजेच पॉटेशियम फॉस्फरस हे जास्त प्रमाणात असतात. तुमच्याकडे जर सुकलेल्या केळीच्या साली नसतील तर तुम्ही बटाट्याच्या सालीचादेखील वापर करू शकता.

जास्वंदाच्या झाडाला पाणी देताना ते कमी किंवा जास्त न देता कुंडीतील मातीमध्ये ओलावा राहील इतकं पाणी द्यावं.

लिंबाचा वापर

झाडाला कळ्या फुले येण्यासाठी आपण ज्या दुसऱ्या वस्तूचा वापर करणार आहोत ती म्हणजे लिंबू. लिंबू हे आम्लधर्मीय आहे आणि भरपूर कळ्या फुले येण्यासाठी आम्लयुक्त मातीची आवश्यकता असते. मात्र, याचा वापर प्रमाणात करायचा आहे. जास्त वापर केल्याने नुकसान होऊ शकते. एका झाडासाठी १० ते १२ इंचाच्या एका कुंडीमध्ये लावलेल्या झाडाला फक्त एक तुकडा एवढाच या लिंबाच्या सालीचा वापर करायचा आहे. केळीच्या सालीचे तुकडे आणि लिंबाचा तुकडा मातीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि वरून भरपूर पाणी घालायचं. ही पोषक तत्त्वे मातीमध्ये मिक्स होतात आणि आपल्या झाडाला मोठा फायदा होतो.

Story img Loader