Jaswand flower grow Marathi Gardening Tips: आपल्या बाल्कनीची शोभा वाढविण्यासाठी आपण विविध प्रकारची रोपं लावतो आणि मग ती रोपं चांगल्या रीतीनं बहरावीत यासाठी रोज काही ना काही उपाय करीत असतो. पण, तुम्ही हे काम जर योग्य पद्धतीनं केले नसेल, तर या मेहनतीचा फार काही उपयोग होतोच, असं नाही. विशेषतः फुलझाडांसाठी महागड्या खतांची गरज नसते; तर तुम्ही अगदी घरगुती पद्धतीनेसुद्धा खत तयार करून रोपांना बहर आणू शकता.

अनेकदा आपण फक्त रोपांना उन्हात ठेवलं आणि दिवसातून दोन वेळा पाणी दिलं की, रोपं वाढतात, असे समजतो. पण, आपण योग्य अशा खताचा वापर केला, तर कोणत्याही फुलाचं रोप कळ्या-फुलांनी बहरून जातं. आज आपण कुंडीत लावता येणाऱ्या सगळ्यांच्या आवडत्या जास्वंदाला भरपूर कळ्या आणण्यासाठी घरगुती उपाय पाहणार आहोत.

Garlic Rate, Vegetable Rate, Pune, Garlic,
लसूण महागला, परराज्यातील लसणाची आवक कमी
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Onion garlic became expensive while the prices of cotton soybeans decreased
ग्राहक, शेतकरी चिंतेत; कांदा, लसूण महागले तर कापूस, सोयाबीनचे दर पडल्याने नाराजी
Increase in cotton soybean prices print politics news
कापूस, सोयाबीनच्या दराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; निवडणूक काळात शेतकऱ्यांमध्ये रोष
Cucumber raita recipe
बुंदी रायता नेहमीच खाता, यावेळी ट्राय करा काकडी रायता; पटकन वाचा साहित्य आणि कृती
leopard and deer Viral Video
‘नशीब प्रत्येक वेळी साथ देत नाही…’ हरणाची शिकार करण्यासाठी बिबट्या वेगाने धावला; पण पुढे जे घडलं… VIDEO पाहून चुकेल काळजाचा ठोका
white giant squirrel spotted in mahabaleshwar
Video : महाबळेश्वरमध्ये पांढऱ्या शेकरूचे दर्शन !
How to use banana peel for mosquito
घरात डासांचा सुळसुळाट वाढतोय? केळीच्या सालीचा ‘हा’ सोपा उपाय डासांचा करेल नायनाट

कुंडीमध्ये लावलेल्या जास्वंदाच्या झाडाची चांगली वाढ होऊन, त्याच्यावर भरगच्च कळ्या येण्यासाठी झाडाची काळजी घेणं, झाडाला वेळोवेळी खताचा पुरवठा करणं आवश्यक असतं. कारण- तरच झाड चांगलं वाढतं आणि कळ्या-फुलांनी बहरून जातं. पावसाळ्यात जास्वंदाच्या झाडाला कीड लागण्याचं प्रमाणदेखील जास्त असतं. त्यामुळे पानं टवटवीत दिसत नाहीत.

हेही वाचा… Rose Flower Tips: गुलाबाच्या रोपाला पटापट कळ्या येण्यासाठी हळदीचा हा सोपा उपाय करून पाहा; पैसे वाचवणारा जुगाडू VIDEO

SP मराठी गार्डनिंग या यूट्यूब अकाउंटवर जास्वंदाच्या खताबाबत, तसंच फुलझाडाला कीड लागू नये आणि भरपूर फुलं यावीत याबाबत घरगुती उपाय सुचवले आहेत.

चहा पावडरचा वापर

जास्वंदाच्या झाडाच्या वाढीसाठी आणि भरपूर फुले येण्यासाठी आपण दोन वस्तूंचा वापर करणार आहोत. त्यातील पहिली वस्तू म्हणजे वापरलेली चहा पावडर. जर चहा पावडर तुम्ही धुऊन, ती स्वच्छ सुकवून याचा खत म्हणून वापर केला, तर झाड फुलांनी बहरून जाईल. कारण- चहा पावडरमध्ये पोटॅशियम, नायट्रोजन, फॉस्फरस यांसारखे घटक जास्त प्रमाणात असतात. त्याचबरोबर कुंडीतील माती अॅसिडिक बनवण्याचं काम चहा पावडरमुळे होतं.

बुरशीसाठी बेकिंग सोड्याचा वापर

झाडाला जर कीड लागली, तर झाडावर फुलं कमी येतात, झाडाची वाढ होत नाही. त्यामुळे आज आपण झाडावरील कीड घालवण्यासाठी सगळ्यांच्या घरोघरी असणाऱ्या या बेकिंग सोड्याचा वापर करणार आहोत. बेकिंग सोडा झाडावरील कीड घालवण्यासाठी उपयुक्त आहे. त्यामुळे झाडाला कोणतीही कीड लागली असेल, तर ती लगेच निघून जाते. त्यासाठी दोन लिटर पाण्यामध्ये अर्धा ते पाऊण चमचा एवढा बेकिंग सोडा व्यवस्थित मिसळून त्याचा स्प्रे झाडावर मारावा.

लक्षात ठेवा- बेकिंग सोड्याचाच वापर करा; बेकिंग पावडर वापरू नये. कारण- बेकिंग पावडरमुळे झाडाचे नुकसान होऊ शकते.

कांद्याच्या साली

या चहा पावडरबरोबर अजून एका वस्तूचा वापर करणे महत्त्वाचे आहे. ती वस्तू म्हणजेच कांद्याच्या साली. घरोघरी असणाऱ्या कांद्याच्या साली वापरून, आपण हे खत तयार करू शकतो.

हे खत तयार करण्यासाठी कांद्याच्या साली दोन दिवस पाण्यात भिजवून ठेवायच्या आहेत; जेणेकरून त्या सालींमधील सगळे पोषक घटक पाण्यात उतरतील आणि हे खत तयार होईल. कांद्याच्या सालीमध्ये फॉस्फरस, कॅल्शियम, सल्फर यांसारखे घटक जास्त प्रमाणामध्ये असतात. त्यामुळे झाडांना फुले जास्त लागतातच; पण झाडाची पानेही हिरवीगार, तजेलदार होतात. झाडाला कीड लागली असेल, तर तीदेखील निघून जाण्यासाठी हे पाणी फायदेशीर ठरते.

हेही वाचा… नारळाची साल फेकताय? थांबा! नारळाच्या सालीपासून आरोग्याला होणारे ‘हे’ ६ फायदे एकदा पाहाच

या तयार झालेल्या पाण्याचा वापर एकदम खत म्हणून न करता, त्याचा वापर पाण्यात डायल्युट करून, नंतर त्याचा वापर झाडासाठी खत म्हणून करावा.

कसा आणि किती प्रमाणात कराल वापर

-एक मग कांद्याच्या सालीचं पाणी असेल, तर त्यात दोन ते तीन मग पाणी मिसळून नंतरच ते पाणी झाडाला वापरायचं.

-हे लिक्विड खत मातीत वापरण्याआधी माती थोडी कोरडी असणे आवश्यक असते.

-एका झाडासाठी दोन ते तीन चमचे चहा पावडर घालून, त्यावर ????लिक्विड खत प्रत्येकी एका झाडासाठी एक मग घालावे.???

-दोन्ही खते महिन्यातून एकदा वापरली, तर झाड कळ्या-फुलांनी भरगच्च होईल.