केस हे महिलांच्या सौंदर्यातील अतिशय महत्त्वाचे असतात. सुंदर केसांमुळे आपले एकंदर व्यक्तिमत्व खुलून येते. केसांना सुंदर बनवण्यासाठी लोकं अनेक पद्धतीने निगा राखतात. त्याचबरोबर केसांची काळजी घेताना वेगवेगळ्या प्रकारचे उपचार करतात जेणेकरून केस सुंदर दिसावेत. काहींना मऊ मुलायम केस आवडतात तर काहींना कुरळे केस. केस सुंदर दिसावेत व आवडीचे केस मिळविण्यासाठी केमिकलवर आधारित केसांवर विविध उपचार करतात. पण तुम्हाला माहित आहे का, केमिकल्सच्या अंदाधुंद वापरामुळे केस कोरडे होतात. तर कधी आपण केसांचा कोरडेपणा कमी करण्यासाठी हेअर स्पा करतो, पण त्याचा परिणाम आपल्या केसांवर काही काळच दिसून येतो.
जर तुम्हालाही कोरड्या केसांचा त्रास होत असेल तर केसांना सुंदर बनवण्यासाठी जावेद हबीब यांच्याकडून जाणून घ्या नैसर्गिक स्पाच्या मदतीने आपण आपले केस कसे मुलायम आणि सुंदर बनवू शकतो. केसांचा कोरडेपणा कमी करण्यासाठी व्हॅसलीन स्पा खूप प्रभावी आहे. चला जाणून घेऊया केसांवर व्हॅसलीन स्पा कसा करायचा त्यामुळे केसांचा कोरडेपणा कमी होतो आणि केस मऊ राहतात.
– हेअर स्पा करण्यासाठी आधी केस ओले करा. त्यानंतर केस खूप कोरडे असतील तर ते लहान सेक्शन्समध्ये विभागून घ्या.
– केसांना मॉइश्चरायझ करण्यासाठी व्हॅसलीन खूप प्रभावी आहे. व्हॅसलीन स्पा तुमच्या केसांचा कोरडेपणा कमी करेल तसेच तुमचे केस सुंदर दिसतील.
– व्हॅसलीन स्पा करण्यासाठी केसांच्या छोट्या भागावर व्हॅसलीन लावा आणि केसांना मसाज करा. तसेच त्वचेचा कोरडेपणा कमी करणारी लस ही केसांचा कोरडेपणा कमी करेल.
– केसांच्या छोट्या भागावर व्हॅसलीन लावल्यानंतर २०-३० मिनिटे केसांवर राहू द्या, असे केल्याने तुमचे केस चमकदार दिसतील.
– हेअर स्पा केल्यानंतर केसांवर थेट शॅम्पू वापरू नका, त्याऐवजी शॅम्पू अगोदर पाण्यात मिसळून लावा, यामुळे केसांवर केमिकलचा प्रभाव कमी होईल.