भारतीय रस्त्यांवर अधिराज्य गाजवलेली जावा नव्या ढंगात पुनरागमनासाठी सज्ज झाली आहे. १ नोव्हेंबर रोजी जावा कंपनीने ‘जावा, जावा 42 आणि जावा पेराक’ असे तीन नवे मॉडेल्स सादर केले होते. देशभरात एकूण १०५ डिलर्सकडे ही मोटरसायकल विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे, तसंच डिसेंबरपर्यंत अजून ६४ डिलर्सकडे ही मोटरसायकल विक्रीसाठी आणि टेस्ट राइडसाठी उपलब्ध होईल असं लाँचिंग कार्यक्रमात सांगण्यात आलं होतं. जावा मोटारसाकलचे देशातील पहिले शोरूम पुण्यात सुरू झालं आहे. बाणेर आणि चिंचडवडमध्ये जावा मोटारसायकलची शोरूम सुरू झाली आहेत.
बाणेर आणि चिंचवड स्टेशनजवळ असेलेल्या जावा शोरूममध्ये मोटारसायकलचे बुकींग सुरू झाले आहे. ५००० रूपयांचे टोकण घेऊन तुम्ही जावाची दमदार बाईक बूक करू शकता. मार्च महिन्यामध्ये जावाची मोटारसायकल तुम्हाला मिळेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. जानेवारीमध्ये गाडीच्या उत्पादनाला सुरूवात होणार आहे. बाणेर येथे असलेले जावा मोटारसायकलचे शोरूम रॉयल एनफिल्डच्या जवळच आहे. त्यामुळे रॉयल एनफिल्डच्या शोरूममध्ये आलेले ग्राहक नक्कीच जावा मोटारसायकल पाहण्यासाठी शोरूममध्ये जाऊ शकतात. जावा आणि रॉयल एनफिल्ड दोन्ही बाईक तरूणांच्या आवडत्या आहेत.
गडद रंगातील लाकडी जोडणी, सुक्ष्म बारकावे, रॉ टेक्सचर्स आणि कापडाची विंटेज ऑक्सब्लड शिवण अशा वैशिष्ट्यांमधून कलाकुसर आणि साहित्यातील प्रामाणिकपणा जपणाऱ्या सुवर्ण काळाची सफर घडवणारी सजावट या ठिकाणी करण्यात आली आहे. त्याचवेळी, क्लासिक डिझाइनमधील आधुनिक दृष्टिकोन आणि त्याला देण्यात आलेली आधुनिक इंजिन तंत्रज्ञान आणि वैशिष्ट्यांची जोड यामुळे ही मोटरसायकल समकालीनतेत भर घातले.
लवकरच सुरू होणाऱ्या १०५ मोटरसायकल्स डीलरशीपमधील देशातील ही पहिलीच आऊटलेट आहेत. ही आऊटलेट आता पूर्णपणे कार्यरत झाल्याने पुण्यातील ग्राहकांना ख्यातनाम जावा मोटरसायकल्स बुक करता येतील आणि त्यांची टेस्ट ड्राइव्हही घेता येईल. जावा मोटारसायकलचे व्यवस्थापकीय संचालक बोमन इराणी यांनी क्लासिक लेजंड्स प्रा. लि.चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. आशिष जोशी यांच्यासह मोठ्या संख्येने आलेल्या जावाप्रेमी आणि ग्राहकांच्या उपस्थितीत पुण्यातील शोरूमचे उद्घाटन झाले.
Classic motorcycles find classy locations in Pune! Shakti Automobiles, Jawas first Dealership is now formally open. Rumble in to experience the nostalgia and test ride the motorcycles today.
Location – https://t.co/BQFzlBWjR6#jawa #JawaMotorcycles #dealership #pune #testrides pic.twitter.com/3XwyCZMCOL
— Anupam Thareja (@reach_anupam) December 15, 2018
Happy faces at the showroom in PCMC, the second dealership inaugurated and open to all. Do visit and let us know what you liked about it. #JawaIsBack #JawaMotorcycles pic.twitter.com/AnxEu1ECrO
— Anupam Thareja (@reach_anupam) December 15, 2018
किंमत –
दी जावा – 1.64 लाख रु. (एक्स शोरुम दिल्ली)
जावा 42 – 1.55 लाख रु. (एक्स शोरुम दिल्ली)
जावा पेराक – 1.89 लाख रु. (एक्स शोरुम दिल्ली)
Jawa Motorcycles स्पेसिफिकेशन्स
सहा गियरबॉक्स
इंजन 293सीसी
लिक्विड कूल्ड सिंगल सिलिंडर
डीओएचसी (डुअल ओवरहेड कॅमशाफ्ट)
गोल हेडलाइट
डिसपर्शन स्टाइलमध्ये लेन्
डुअल डिस्क ब्रेक
We’re happy to announce the opening of our first dealerships in Pune at the locations below. Stop by and experience the #Jawa & the #Jawafortytwo up close. Riding down to other cities soon! Stay tuned!
11am: https://t.co/OE3Tbl85CQ
2pm: https://t.co/sbPIfHwWaq #JawaIsBack #pune pic.twitter.com/roCtIpHiFx
— Jawa Motorcycles (@jawamotorcycles) December 15, 2018
जावा मोटरसायकल या मूळच्या झेक कंपनीचं पहिलं मॉडेल 1929 साली जन्माला आलं ते 499 सीसीचं होतं. भारतीय बाजारपेठेच्या गरजेनुसार व सध्याचा तरूणाईचा कल बघून महिंद्रा नवीन जावा बाजारात आणली आहे.
इटलीमधल्या वरेसी इथल्या तांत्रिक केंद्रामध्ये जगातील आघाडीच्या इंजिन तज्ज्ञांबरोबर काम केल्यानंतर नवीन जावा तयार करण्यात आल्याचं कंपनीनं म्हटलं आहे. या बाईकचं वैशिष्ट्य सांगताना आयुष्यभर साथ देईल असं नमूद करण्यात आलं आहे. इंजिनच्या एगझॉट यंत्रणेवर विशेष मेहनत घेण्यात आली असून योग्य त्या पाईपांची निवड करण्यात आली आहे, ज्यामुळे हवा तो परिणाम साधला गेल्याचा दावा करण्यात आला आहे.