महिंद्रा अँड महिंद्राच्या मालकिच्या क्लासिक लीजंड्स कंपनीने आपली बॉबर स्टाइल बाइक Jawa Perak नोव्हेंबर  2019 मध्ये भारतात लाँच केली होती. आता कालपासून अर्थात एक जानेवारी 2020 संध्याकाळी सहा वाजेपासून या बाइकच्या बुकिंगसाठी सुरूवात झालीये. 10 हजार रुपयांत कंपनीच्या संकेतस्थळावरुन किंवा डिलर्सकडून बाइक बुक करता येईल, तर 2 एप्रिल २०२० पासून या बाइकची डिलिव्हरी सुरू होणार आहे.  1.95 लाख रुपये इतकी या बाइकची एक्स-शोरुम किंमत आहे. कस्टम स्टाइल असलेल्या या बाइकची भारतात Royal Enfield, बजाज डोमिनार आणि harley davidson यांसारख्या बाइकशी टक्कर असणार आहे. ही एक बॉबर स्टाइल बाइक आहे. यात स्विंगआर्म आणि मागे ट्विन सस्पेंशनच्या जागी एकच मोनोशॉक सस्पेंशन दिलं आहे.

इंजिन –

1946 मध्ये दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेस पॅरिस मोटर शोमध्ये सादर केलेल्या बाइकच्या नावावरुन ‘जावा पेराक’ हे नाव घेण्यात आलं आहे. जुन्या पेराक बाइकमध्ये 250सीसी क्षमतेचं इंजिन होतं, तर नव्या पेराकमध्ये 334सीसी क्षमतेचं सिंगल सिलेंडर, लिक्विड कूल्ड इंजिन आहे. हे इंजिन 30bhp ची ऊर्जा आणि 31 न्यूटन मीटर टॉर्क निर्माण करतं. 6 स्पीड गिअरबॉक्सचा पर्याय देखील यात आहे. पॉवर आणि टॉर्कच्या तुलनेत ही बाइक Classic आणि Forty Two ला मागे सोडते.

मुख्य फीचर्स –
जावा Classic आणि 42 मध्ये जिथे ड्रम ब्रेक सेटअप आहे. तिथे Perak मध्ये ड्युअल चॅनल ABS सोबत मागे आणि समोर डिस्क ब्रेक्स दिले आहे. या बाइकच्या पुढील बाजूला 18 इंचाचे स्पोक व्हिल आहेत, तर मागील बाजूला 17 इंच व्हिल आहे. बाइकमध्ये चालकाच्या सुरक्षेसाठी ड्युअल चॅनल एबीएस ब्रेकिंग सिस्टिम आहे. बाइकच्या हेडलाइटवर डिजिटल मीटर आहे.