आयुष्यात अनेकदा असे काही प्रसंग येतात की, जेव्हा व्यक्तीला कठोर निर्णय घ्यावे लागतात; पण निर्णय घेताना कोणत्या मनस्थितीत आपण निर्णय घेत आहोत, हे समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे. प्रेरणादायी वक्त्या जया किशोरी यांनी या संदर्भात एक मूलमंत्र दिला आहे. आज आपण त्याविषयीच सविस्तर जाणून घेऊ या.
जया किशोरी या एक प्रेरणादायी वक्त्या आहेत. व्यक्तीने जीवन जगताना कसे वागावे, याविषयी त्या नेहमी मार्गदर्शन करीत असतात. सोशल मीडियावर त्या नेहमी प्रेरित करणारे व्हिडीओ शेअर करीत असतात. त्यांचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेक लोक त्यांचे विचार आचरणात आणतात.
जया किशोरी यांनी शेअर केलेल्या एका व्हिडीओत त्या सांगतात, “कधीही रागाच्या भरात निर्णय घेऊ नये. एखाद्या व्यक्तीबरोबर तुमचे भांडण झाले आणि ती व्यक्ती रागात तुम्हाला असे काही बोलली की, ज्याचे तुम्हाला खूप वाईट वाटले; मग तुम्ही त्या व्यक्तीबरोबरचे नाते तोडता. पण काही वेळानंतर तुम्हाला पश्चात्ताप होतो की, भांडण इतकेही मोठे नव्हते की, तुम्ही त्या व्यक्तीबरोबरचे नाते तोडावे. पण, वेळ निघून गेलेली असल्यामुळे तुम्ही काहीही करू शकत नाही. त्यामुळे रागाच्या भरात कधीही कोणता निर्णय घेऊ नका. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी १०० वेळा विचार करावा”
हेही वाचा : Weight Gain After Delivery : प्रसूतीनंतर वजन वाढणे चांगले की वाईट? वाचा, काय सांगतात डॉक्टर…
जया किशोरी यांनी त्यांच्या iamjayakishori या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर केला असून, या व्हिडीओवर हजारो युजर्सच्या लाइक्स आणि कमेंट्स आल्या आहेत.
एका युजरने लिहिलेय, “खरं बोलत आहात.” तर एका युजरने विचारलेय, “जर आपलेच लोक चांगले नसतील, तर काय करावं?