दिवाळी आली की वेगवेगळ्या कंपन्या आपल्य़ा ऑफर्स लाँच करतात. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी टेलीकॉम ऑपरेटर कंपन्यांची धडपड सुरु असते. रिलायन्स जिओने बाजारात दाखल होत मागच्या दिड वर्षात खळबळ उडवली आहे. जिओने मोफत इंटरनेट आणि कॉलिंगची सुविधा दिल्याने इतर कंपन्यांचे धाबे दणाणले होते. त्यानंतरही एकाहून एक आकर्षक प्लॅन जाहीर करत कंपनीने आपल्या ग्राहकांना खुश करण्याचे ठरवले आहे. दिवाळीच्या निमित्ताने कंपनीने आणखी एक खास ऑफर जाहीर केली आहे. दिवाळी जिओ ऑफर असं या नव्या प्लॅनचे नाव आहे. या प्लानमध्ये ग्राहकांना १०० टक्के कॅशबॅक मिळणार आहे. हा प्लॅन १८ ऑक्टोबर रोजी सुरु झाला असून तो ३० नोव्हेंबरपर्यंत सुरु राहणार आहे. जिओच्या सर्व ग्राहकांना त्याचा लाभ घेता येईल असे कंपनीने कळवले आहे.

जिओच्या या प्लानची किंमत १६९९ रुपये असून त्यामध्ये अनलिमिटेड कॉलिंगही मिळणार आहे. याशिवाय हे रिचार्ज केल्यास ग्राहकांना रोज १०० एसएमएस मिळणार आहे. विशेष म्हणजे जिओच्या या प्लॅनची मुदत एक वर्षासाठी असणार आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना एकूण ५४७.५ जीबी डेटा मिळणार असून तो संपल्यानंतर ६४ kbps चा स्पीड मिळणार आहे. १०० टक्के कॅशबॅक आणि इतक्या सुविधा देणारा हा प्लॅन ग्राहकांसाठी निश्चितच फायदेशीर आहे.

Sensex falls 73 points on Nifty ends below 24800
ऐतिहासिक ७७,७०१ कोटींची विदेशी गुंतवणूक ऑक्टोबरमध्ये माघारी, सेन्सेक्स, निफ्टीच्या घसरणीत आणखी  विस्तार
24th October 2024 Horoscopes In Marathi
24 October Horoscope : गुरुपुष्यामृत योग कोणत्या राशींसाठी…
Indel Money launches Rs 150 crore NCD
इंडेल मनी रोखे विक्रीतून १५० कोटी उभारणार; ६६ महिन्यांत गुंतवणुकीवर दुपटीने लाभ
Trade deficit narrows to five month low in September
व्यापार तूट घटून सप्टेंबरमध्ये पाच महिन्यांच्या नीचांकी
Decision from Wipro on Thursday on reward shares
बक्षीस समभागावर विप्रोकडून गुरुवारी निर्णय
Meesho has announced a nine-day leave for its employees. (Photo: Meesho/LinkedIn)
“एक नंबर!”, मिशोने दिली कर्मचाऱ्यांना ९ दिवसांची रजा; कंपनीच्या निर्णयाचं नेटकऱ्यांनी केलं तोंडभरून कौतुक
SEBI Mandates To Offer UPI-Based three in one account to investors
गुंतवणूकदारांना ‘थ्री-इन-वन’ खाते देणे शेअर दलालांना बंधनकारक; १ फेब्रुवारी २०२५ पासून नवीन नियम बंधनकारक
IPO
जागतिक स्तरावर आयपीओच्या माध्यमातून ८२२ कंपन्यांकडून ६५ अब्ज डॉलरची निधी उभारणी