रिलायन्स जिओ युजर्ससाठी नवनव्या ऑफर्स सादर करत त्यांना आकर्षित करण्यात आघाडीवर आहे. टेलिकॉम क्षेत्रात सध्या जोरदार स्पर्धा सुरु असताना कंपन्या एकाहून एक चांगल्या ऑफर देत आहेत. नुकतीच जिओने ३९९ रुपयांच्या रिचार्जवर २५९९ रुपयांची कॅशबॅक ऑफरही जाहीर केली. यानंतर आता कंपनीने आता कंपनीने जिओ टीव्ही लाईव्ह स्ट्रीमिंग सर्व्हिसचे वेब व्हर्जन लॉन्च केले आहे. या सुविधेचा लाभ घेत युजर्स आता वेब ब्राऊझर्सच्या माध्यमातून लाईव्ह टीव्ही शो पाहू शकतात. जिओ टीव्हीच्या वेब व्हर्जनची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून केली जात होती. अखेर ती पूर्ण झाल्याने युजर्समध्ये आनंदाचे वातावरण आहे.
ही सुविधा केवळ जिओच्या युजर्ससाठीच असून युजर्सच्या या मागणीला पूर्ण करण्यासाठी जिओने टीव्हीचे वेब व्हर्जन लॉन्च केले आहे. जर तुम्ही जिओ युजर्स असाल कर कोणत्याही ब्राऊजर मध्ये जावून https://jiotv.com/ लॉगईन केल्यावर हे पाहता येणार आहे. जिओ टीव्हीच्या वेब व्हर्जनमध्ये युजर्सला जिओ टीव्ही अॅपमध्ये उपलब्ध असलेल्या गोष्टी आणि ठराविक टीव्ही चॅनल्स पाहता येतील. जिओ टीव्ही मध्ये एंटरटेनमेंट, मुव्ही, न्यूज आणि स्पोर्ट्स असे सर्व चॅनल्स आहेत.
तुम्ही तुमच्या आवडीची भाषा निवडून त्या भाषेतील चॅनेल पाहू शकता. यामध्ये विशिष्ट चॅनेलचा मागील सात दिवसातील कंटेंटही दिसू शकेल. वेबवर जिओ टीव्ही किंवा जिओ सिनेमा पाहण्यासाठी तुम्हाला jiotv.com किंवा jiocinema.com वर लॉगईन करावे लागेल. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला एक युजर आयडी आणि पासवर्ड लागेल. याशिवाय यामध्ये तुम्हाला एचडी चॅनल नको असेल तर त्यासाठी विशेष फिल्टर सुविधाही देण्यात आली आहे.