How To Make Curries Thick: अनेकदा जेव्हा आपल्याला छान हॉटेलसारखी क्रिमी भाजी करायची असते आपण तेव्हा पाणी वापरणे टाळतो पण तरीही शिजवताना भाजीला पाणी सुटून त्यात रस्सा तयार होतोच. याचे मुख्य कारण म्हणजे तुम्ही पाणी प्रत्यक्ष वापरले नाही तरी अनेक भाज्या, मसाल्यांना पाणी सुटते. काही वेळा आपण भाजीत खोबरे वापरतो, नारळाचे दूध वापरतो यामुळे पाणी सुटू शकते. शिवाय अनेकदा भाज्या फ्रिजमधून थेट कढईत टाकल्या जातात यामुळे तसेच मिठामुळे सुद्धा भाजीत पाणी जास्त होते. हे टाळण्यासाठी बहुतांश हॉटेलमध्ये क्रीम वापरली जाते.
पण घरी क्रीम आपण आणणार म्हणजे छोटं पॅकेट सुद्धा एकापेक्षा जास्त वेळेला वापरता येईल एवढं असतं. शिवाय ते वैधतेच्या दिवसात न वापरल्यास लगेच खराब होऊ शकते, उन्हाळ्यात तर याचे प्रमाण अधिक असते. अशावेळी सोप्या पद्धतीने याच महागड्या क्रीमला घरगुती पर्याय काय हे आपण जाणून घेणार आहोत.
हॉटेल स्टाईल क्रिमी भाजी बनवण्यासाठी टिप्स (How To Make Thick Curry For Vegetables)
१) दुधाची साय फेटून टाकल्याने भाजीला घट्टपणा येतो.
२) नुसते दही टाकणे टाळा कारण यामुळे पुन्हा दह्याचे पाणी होऊ शकते. त्याऐवजी किंचित बेसन किंवा गव्हाचे पीठ मिसळून दही टाकू शकता.
३) मैदा- कॉर्नफ्लॉवर आणि बटर ही पेस्ट सुद्धा भाज्यांचा घट्टपणा वाढवण्यासाठी कामी येऊ शकते पण थेट हे मिश्रण भाजीत मिसळू नका आधी एका सॉसपॅन मध्ये थोडं भाजून घेतल्यावर मगच ऍड करा.
४) जर तुम्हाला ऍसिडिटीचा त्रास नसेल तर, शेंगदाण्याचे कूट किंवा पीनट बटर सुद्धा मिक्स करू शकता.
५) अगदी चविष्ट पर्याय म्हणजे काजू. काजू व दुधाची जाडसर पेस्ट करून भाजीत मिक्स केल्यास याला चव व घट्टपणा दोन्ही यायला मदत होते.
६) तुम्ही ऍसिडिटी टाळण्यासाठी मुगाची डाळ भिजवून ठेवू शकता व मग पाणी काढून त्याची पेस्ट करून भाजीत मिक्स करू शकता.
७) तुम्ही भाजीत टोमॅटो वापरत असाल तर शक्यतो त्याच्या बी काढून मग वापरा जेणेकरून मुळातच पाण्याचे प्रमाण कमी होऊ शकते.
हे ही वाचा<< १ वाटी तांदळात चौघांना पुरतील इतके नीर डोसे बनवा; शिल्पा शेट्टीच्या ‘या’ रेसिपीचा Video आताच बघून ठेवा
८) तांदळाच्या पिठाची पेस्ट सुद्धा वापरू शकता.
९) भोपळ्याच्या व सूर्यफुलाच्या बिया बाजारात मिळतात. या बिया एकदाच आणून ठेवू शकता व आवश्यकतेनुसार वाटून तुम्ही भाजीत मिक्स करू शकता.
१०) कांदा व ओलं खोबरं वाटून टाकल्याने सुद्धा घट्टपणा येऊ शकतो. सुकं खोबरं सुद्धा वापरू शकता पण याने चवीत फरक येऊ शकतो.
वरील टिप्स तुमच्या कामी आल्यास आम्हाला कळवायला विसरु नका व तुमच्या मैत्रिणींसह नक्की शेअर करा.