Jugaad Tricks : प्रत्येक पालकाला असं वाटतं की, त्यांच्या मुलांनी स्वच्छ आणि नीटनेटके राहावे. शाळेत जाताना मुलांनी स्वच्छ आणि सुंदर गणवेश घालावा. यासाठी पालक आठवड्यातून एक ते दोनदा मुलांचा गणवेश धुतात. मळलेला गणवेश नव्यासारखा स्वच्छ करतात, पण अनेकदा पालक मुलांच्या स्कूल बॅगकडे लक्ष देत नाहीत.
स्कूल बॅगवर अनेकदा इंक, चॉकलेट किंवा तेलाचे डाग पडलेले असतात, यामुळे बॅग आणखी मळलेली दिसून येते. असे डाग स्वच्छ करणे खूप कठीण जाते, पण टेन्शन घेऊ नका, आज आम्ही तुम्हाला काही हटके घरगुती उपाय सांगणार आहोत.

  • बॅगवर असलेले डाग स्वच्छ करण्यासाठी तुम्ही डिटर्जंट पावडरचा उपयोग करू शकता. यासाठी पाण्यामध्ये डिटर्जंट पावडर टाका आणि या मिश्रणात अर्धा तास मळलेली स्कूल बॅग भिजत ठेवा. त्यानंतर ही बॅग मऊ ब्रशनी स्वच्छ करा.

हेही वाचा : Weight Loss : वजन कमी करण्यासाठी कार्डिओसह स्ट्रेंथ ट्रेनिंग आणि आहार का गरजेचा आहे? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात

Alum Cleaning Hacks
घरातील फरशी चकाचक करण्यासाठी तुरटी आहे अत्यंत फायदेशीर; जाणून घ्या सोप्या टिप्स
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Loksatta chaturang article Free of mobile mind result Counselor
सांदीत सापडलेले…! अवधान
kitchen Jugad Tired of removing coconut
नारळाच्या शेंड्या काढून वैतागलात? ‘हा’ सोपा जुगाड एकदा वापरा अन् झटक्यात होईल काम
Boy Spoils Sister's Rangoli Caught on CCTV
संधी साधली अन् बहिणीने काढलेली रांगोळी खराब केली, पण अशी झाली पोलखोल, VIDEO एकदा पाहाच
Apple new Share Item Location feature
Share Bag Location: प्रवासादरम्यान लगेज हरवलं? आता चिंता सोडा, तुम्हाला मदत करणार शेअर बॅग लोकेशन
Pune Burglary attempted, Sadashiv Peth Burglary,
पुणे : सदाशिव पेठेत भरदिवसा घरफोडीचा प्रयत्न, महिलेला धक्का देऊन चोरटा पसार
  • बेकिंग पावडरच्या मदतीने तुम्ही बॅग नव्यासारखी स्वच्छ करू शकता. यासाठी बेकिंग पावडरमध्ये थोडे पाणी टाका आणि घट्ट मिश्रण करा. हे मिश्रण डागांवर लावा आणि दहा मिनिटे तसेच ठेवा. दहा मिनिटांनंतर त्यावर मऊ ब्रशनी घासा. डाग झटक्यात निघून जाईन.
  • कोणतेही डाग काढण्यासाठी अनेक जण लिंबू आणि मीठाचा वापर करतात. यासाठी एका भांड्यात लिंबाचा रस घ्या, त्यात एक चमचा मीठ टाका. हे मिश्रण डागांवर लावा आणि दहा मिनिटे ठेवा. त्यानंतर स्वच्छ आणि मऊ ब्रशनी चांगले घासा. बॅग नव्यासारखी दिसू शकते.

(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)