Reuse Old Milk Bags : दूध हा भारतीय आहारातील सर्वात महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे खूप क्वचितच असे लोक असेल जे दुधाचे सेवन करत नाही. लहानांपासून वृद्ध लोकांपर्यंत सर्व जण आवडीने दूध पितात. फक्त दुध नाही तर दुधापासून चहा किंवा अन्य पदार्थ बनवून त्याचे सेवन करतात. त्यामुळे दूध हा प्रत्येकाच्या दररोजच्या आहारातला महत्त्वाचा भाग आहे. ग्रामीण भागात घरोघरी गाया असतात. त्यामुळे शुद्ध चांगले दूध गाव खेड्यात सहज मिळते. शहरात सहसा दूध प्लास्टिक पिशव्यांमध्ये विकले जाते. तुम्ही सुद्धा प्लास्टिक पिशव्यांमधील दूध विकत घेता का? जर होत तर दूध वापरल्यानंतर त्या प्लास्टिक पिशव्यांचे काय करता? दुधाच्या रिकाम्या पिशव्या फेकून देता का? जर तुम्ही त्या पिशव्या दररोज फेकत असाल तर आताच थांबवा कारण आज आम्ही तुम्हाला या प्लास्टिक पिशव्यांचा पुन्हा उपयोग कसा करायचा, हे सांगणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
  • या दुधाच्या पिशव्यांपासून तुम्ही कोन तयार करू शकता. तुम्हाला वाटेल कोनचा कसा उपयोग करायचा? कोन बनवून तुम्ही त्यात आईसक्रिम खाऊ शकता किंवा मेहेंदीचा कोन बनवू शकता. यासाठी या पिशव्यांना कोनचा आकार द्या. नीट चिकटपट्टीच्या मदतीने कोन तयार करा.
  • जर तुम्हाला बागकाम आवडत असेल तर तुम्ही रिकाम्या दुधाच्या पिशव्यांचा वापर करुन कुंडी बनवू शकता.यासाठी तुम्हाला दुधाची पिशवी एका बाजूने पूर्णपणे कापावी लागेल. त्यात माती टाकायची आणि त्यानंतर त्यात तुम्ही रोपटे लावू शकता. हा एक चांगला पर्याय आहे.
  • तुम्ही दुधाच्या पिशव्यांपासून चटई बनवू शकता. यासाठी तुम्हाला भरपूर दुधाच्या पिशव्या कात्रीने कापून घ्या. त्यानंतर या सर्व कापलेल्या पिशव्या एकमेकांना चिकटपट्टीच्या मदतीने जोडून घ्या. तुम्हाला पाहिजे त्या आकाराची चटई तुम्ही बनवू शकता. या चटई तुम्ही बसायला वापरू शकता.

हेही वाचा : फक्त चार हिरव्या मिरच्यांनी पळवा घरातील उंदीर, परत कधीही दिसणार नाही, पाहा व्हिडीओ

  • दुधाच्या प्लास्टिक पिशव्या खूप टिकाऊ असतात. त्यामुळे दुधाच्या पिशव्यांपासून तुम्ही पुस्तकांचे कव्हर बनवू शकता. यासाठी तु्म्ही तीन ते पाच दिवसाचे दुधाच्या पिशव्या गोळा कराव्या लागतील. या पिशव्या पुस्तकाच्या आकारानुसार नीट कापून घ्या आणि त्यानंतर पुस्तकांना कव्हर लावा.
  • दुधाच्या पिशव्यांपासून तुम्ही पंखा बनवू शकता. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये याचा चांगला वापर तुम्ही करू शकता. यासाठी दुधाच्या पिशव्यांना तुम्ही गोलाकार आकार देऊ शकता आणि या बॉर्डरवर कापड लावा.त्यानंतर हे एका काठीला जोडा आणि याचा पंखा म्हणून वापर करा.
मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jugaad tricks never throw milk plastic bag know how to reuse old milk bags ndj
Show comments