Jugaad Video : आपण अनेकदा बाहेर फिरायला जाताना पाण्याची बाटली घेतो आणि पाणी प्यायल्यानंतर ती बाटली फेकून देतो पण तसे करू नका, त्या बाटलीच्या मदतीने तुम्ही तुमच्या घरातील सर्व फर्निचर स्वच्छ करू शकता. तुम्हाला वाटेल, ते कसं शक्य आहे? पण हे खरंय. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये फक्त एका बाटलीच्या मदतीने फर्निचर स्वच्छ कसं करायचं, याविषयी सांगितले आहे.

अनेकदा घरातील फर्निचर आपण नेहमी नेहमी स्वच्छ करत नाही त्यामुळे त्यावर धूळ साचते. अशावेळी तुम्ही जर एक मिश्रण बनवून ठेवले तर तुमच्या घरातील फर्निचर तुम्ही कधीही स्वच्छ करू शकता. जाणून घेऊ या सविस्तर…

हेही वाचा : तुम्हालाही ओठांना सतत लिप बाम लावण्याचे व्यसन तर नाही ना? काय होतात परिणाम? वाचा डॉक्टरांचे मत….

या व्हिडीओमध्ये सांगितल्याप्रमाणे –

सुरुवातीला एक प्लास्टिकची बाटली घ्या. बाटलीच्या झाकणाला छिद्र पाडा. त्यानंतर बाटलीमध्ये पाणी भरा पण पाणी पूर्णपणे भरू नका. त्यात थोडा शाम्पू टाका आणि त्यानंतर त्यात खडे मीठ किंवा साधे मीठ टाका. हे मिश्रण पाण्यात एकजीव करा. त्यानंतर या बाटलीचा स्प्रे म्हणून वापर करा आणि फर्निचरवर हा स्प्रे मारा. हे मिश्रण बाटलीमध्ये टाकायचं कारण म्हणजे यामुळे सगळीकडे नीट स्प्रे करता येते. बाटलीचा उपयोग होतो आणि हे मिश्रण आपल्याला साठवता सुद्धा येते. सर्व मिश्रण टाकल्यानंतर फर्निचर मऊ स्पंजनी घासा. त्यानंतर पाण्याने हे फर्निचर धुवून घ्या. प्लास्टिक आणि फायबरचे फर्निचर तुम्ही असे स्वच्छ करू शकता. लाकडी फर्निचर स्वच्छ करताना हे मिश्रण स्प्रे करा आणि सुती कापडाने पुसा. हा उपाय वापरून तुम्ही घरातील फर्निचर स्वच्छ करू शकता.

हेही वाचा : Jugaad Video : पावसाळ्यात हा जुगाड करा! फक्त एका जुन्या चाळणीपासून बनवा कपडे सुकवण्याचे क्लिप हँगर

पाहा व्हायरल व्हिडीओ, येथे क्लिक कर

Prajakta Salve या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “फक्त १ बाटलीने तुमच्या घरातील सर्व फर्निचर स्वच्छ होईल.” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
प्राजक्ता साळवे या त्यांच्या युट्यूब अकाउंटवरून घरगुती उपाय सांगतात. त्यांच्या प्रत्येक व्हिडीओच्या माध्यमातून त्या नवनवीन माहिती सांगतात. युट्यूबवर ७० हजार लोक त्यांना फॉलो करतात.