How to clean charger cable with the help of toothpaste : फोन हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचा घटक आहे. अन्न, वस्त्र निवारा प्रमाणे मोबाईल ही अत्यंत गरजेची वस्तू आहे. माणूस क्षणभरही फोनशिवाय राहू शकत नाही. प्रत्येक व्यक्ती मोबाईलला खूप जपतो. कारण एक दिवसही मोबाईल बंद पडला तरी अनेक कामे थांबतात. मोबाईलसह त्याचा चार्जरही महत्त्वाचा आहे.
अनेकदा आपण मोबाईल चार्जरची नीट काळजी घेत नाही. सतत वापरल्यामुळे कालांतराने चार्जर केबल काळी पडते. तुमचीही चार्जर केबल काळी पडली आहे का? टेन्शन घेऊ नका, आज आपण एक असा सोपा जुगाड जाणून घेणार आहोत की या जुगाडच्या मदतीने तुम्ही चार्जर केबल स्वच्छ करू शकता. सध्या या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये टूथपेस्टच्या मदतीने चार्जर केबल कशी स्वच्छ करायची, याविषयी सांगितले आहे. (Jugaad Video how to clean charger cable with the help of toothpaste watch viral video)
या व्हायरल व्हिडीओमध्ये दाखवल्याप्रमाणे–
- चार्जर केबल घ्यावी.
- त्यानंतर छोटा कापसाचा तुकडा घ्यावा.
- या कापसाच्या तुकड्यावर टूथपेस्ट लावावी.
- त्यानंतर कापसाने ही केबल स्वच्छ करावी.
- काळी पडलेली चार्जर केबल अगदी पांढरी शुभ्र दिसेल.
- अशाप्रकारे फक्त टूथपेस्टच्या मदतीने तुम्ही काळी पडलेली चार्जर केबल स्वच्छ करू शकता.
पाहा व्हायरल व्हिडीओ
parireview या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “ही ट्रिक मला आधी माहिती असायला हवी होती.” तर एका युजरने लिहिलेय, “कोलगेटचे किती फायदे आहेत!” आणखी एका युजरने लिहिलेय, “कोलगेट : मेरी शक्तीयो का गलत इस्तेमाल हो रहा है” एक युजर लिहितो, “मस्त जुगाड, मला ही ट्रिक खूप आवडली.”
यापूर्वी असे अनेक घरगुती जुगाडचे व्हिडीओ व्हायरल झाले आहे. काही जुगाड मजेशीर असतात तर काही जुगाड थक्क करणारे असतात. अनेक जण जुगाडच्या माध्यमातून आपली क्रिएटिव्हीटी दाखवतात पण हा भन्नाट जुगाड पाहून तुम्हीही थक्क व्हाल. अनेकांना हा जुगाड आवडू शकतो.