How to clean dust out of sliding window tracks : आपले घर स्वच्छ आणि सुंदर दिसावे, असे प्रत्येकाला वाटते पण दररोजच्या धावपळीच्या आयुष्यात आपण फक्त सुट्टीच्या दिवशी वेळ काढून घर स्वच्छ करतो. स्वयंपाकघर, बाथरुम, टॉयलेट, दारे खिडक्या इत्यादी स्वच्छ करतो. खास करुन खिडक्या नियमित स्वच्छ न करत असल्यामुळे स्लायडिंग खिडक्यांच्या ट्रॅकमध्ये धूळ जमा होते. ही धूळ स्वच्छ कशी करायची, हे सुद्धा खूप मोठे आव्हान असते कारण हा भाग अरुंद असल्यामुळे स्वच्छ करायला कठीण असतो. त्यामुळे अनेकदा आपण या खिडक्यांच्या ट्रॅककडे दुर्लक्ष करतो आणि धूळ साचल्यामुळे हा भाग काळा पडतो. पण तुम्हाला माहितीये का, स्लायडिंग खिडक्यांच्या ट्रॅकमधील धूळ स्वच्छ करता येते.
इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये खिडक्यांच्या ट्रॅकमधील धूळ कशी स्वच्छ करायची, याविषयी एक सोपी ट्रिक सांगितली आहे. सोशल मीडियावर असे घरगुती ट्रिक्स सांगणारे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात पण हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
या व्हायरल व्हिडीओमध्ये दाखवल्याप्रमाणे, सुरुवातीला एक स्पंज घ्या. लक्षात ठेवा, या स्पंजचा आकार तुमच्या खिडक्यांच्या ट्रॅक एवढाच असावा. ट्रॅकच्या खोचाप्रमाणे स्पंजवर खुणा करा आणि तेवढा भाग कापून घ्या. त्यानंतर व्हिडीओत दाखवल्याप्रमाणे, कापलेला भाग खिडकीच्या ट्रॅकच्या अरुंद भागामध्ये जाईल, या प्रमाणे स्पंज ट्रॅकवर ठेवा आणि धूळ स्वच्छ करा. ही एक सोपी ट्रिक आहे ज्याद्वारे तुम्ही सहजपणे स्लायडिंग खिडक्यांच्या ट्रॅकमधील धूळ स्वच्छ करू शकता.
nicelife.hacks या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “स्लायडिंग खिडक्यांच्या ट्रॅकमधील धूळ स्वच्छ करण्याची टीप” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहलेय, “खूप उपयोगी ट्रिक आहे” तर एका युजरने लिहिलेय, “भन्नाट आयडिया” आणखी एका युजरने लिहिलेय, “धन्यवाद.. खूप छान माहिती दिली”