Viral Video : बागकाम हा अनेकांचा आवडता विषय असतो. अनेक जण आवडीने घरी बाग तयार करतात आणि कुंड्यांमध्ये झाडे, फुले फळे लावतात. तुमच्या घरी बाग आहे का? किंवा कुंड्यांमध्ये झाडे लावली आहेत का? जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या कुंड्या अधिक आकर्षक दिसाव्यात, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पाच मिनिटांमध्ये कुंड्या कशा रंगवायच्या, याविषयी सांगितले आहे. (Jugaad Video how to Paint plants Pots in just five minuts)

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक महिला दिसेल. ती कुंड्या कशा रंगवायच्या, हे प्रत्यक्षात करून दाखवत आहे. व्हिडीओत दाखवल्याप्रमाणे – ती सुरुवातीला एक मोठे पातेलं घेते आणि त्यात पाणी टाकते.पाण्यात ती तिच्या आवडीचे रंग टाकते आणि रंगाना हलक्या हाताने फिरवते. सर्व रंग पाण्यावर तरंगताना दिसतात. त्यानंतर ती पांढरी शुभ्र कुंडी घेते आणि पातेल्यात टाकलेल्या पाण्यातून काढते. पाण्यावर तरंगत असलेले रंग अतिशय सुंदरपणे कुंडीवर दिसून येतात. अशाप्रकारे अवघ्या काही मिनिटांमध्ये ती कुंड्या रंगवताना दिसते.
ही भन्नाट ट्रिक पाहून तुम्हीही थक्क व्हाल. काही लोकांना हा व्हिडीओ पाहून हा जुगाड करून पाहावासा वाटू शकतो. ज्या लोकांना घरच्या कुंड्या रंगवायचा त्रास येत असेल त्यांच्यासाठी हा भन्नाट उपाय आहे.

हेही वाचा : “मी वाईट आई आहे का?”, मुलांना ओरडताच तुम्हालाही अपराधीपणा जाणवतो का? या भावनेतून स्वत:ला बाहेर कसे काढावे, जाणून घ्या

पाहा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा : तुम्हीही थंडगार ‘मोहब्बत का शरबत’ पिताय का? थांबा लक्षात घ्या आहारतज्ज्ञांनी सांगितलेला धोका

asha.ahk या इन्स्टाग्राम अकाउंटवरून आशा कोवे यांनी हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “खूप सुंदर व्हिडीओ आहे” तर एका युजरने लिहिलेय, “खूप छान ट्रिक आहे.” काही युजर्सनी पाण्यामध्ये कोणता पेंट टाकला, असे विचारले आहे. त्यावर आशा कोवे यांनी प्रतिक्रिया ग देत सांगितले आहे की त्यांनी आशियन पेंट वापरला आहे.

सोशल मीडियावर यापूर्वी सुद्धा असेच घरगुती जुगाडचे व्हिडीओ समोर आले आहेत. भारतात जुगाड करणाऱ्यांची कमतरता नाही. लोक एकापेक्षा एक भन्नाट जुगाड शोधून सोशल मीडियावर शेअर करत असतात.