Jugaad Video : सध्या उन्हाळा सुरू आहे. उन्हाळ्यात उष्णतेवर मात करण्यासाठी अनेक जण ताजे लिंबू पाणी आवडीने पितात. तुम्ही पण अनेकदा घरी लिंबू पाणी बनवत असाल. लिंबु पाणी बनवल्यानंतर तुम्ही लिंबाचे साल फेकून देता का? जर हो तर यानंतर असे करू नका. या सालीचा तुम्ही खूप चांगला उपयोग करू शकता. सोशल मीडियावर अनेक जुगाडचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या असाच एक जुगाडचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका महिलेने लिंबाच्या सालीचा कसा उपयोग करायचा, हे सांगितले आहे.
लिंबाच्या सालीचा कसा उपयोग करायचा?
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की गॅसवर एका भांड्यात दोन ग्लास पाणी घेतले आणि त्यात लिंबाच्या साली टाकल्या. लिंबाचे साल जोपर्यंत मऊ होत नाही तोपर्यंत कमी आचेवर या साली उकळून घेतल्या. त्यानंतर हे उकळून घेतलेले पाणी थंड झाल्यानंतर एका प्लास्टिकच्या बाटलीत टाकले. त्यानंतर दोन चमचे डिश वॉशचे लिक्विड त्यात टाकले त्यानंतर त्यात एक चमचा बेकिंग सोडा टाकला. त्यानंतर पितांबरी दोन चमचे टाकली.
व्हिडीओत तुम्हाला दिसेल की पुढे हे मिश्रण एकत्र केल्यानंतर या मिश्रणाचा वापर महिला भांडी घासायला, गॅस शेगडी पुसण्यासाठी करताना दिसतेय. व्हिडीओत महिला सांगते की या मिश्रणाचा वापर करून तुम्ही कोणत्याही प्रकारचे भांडी घासू शकता. याशिवाय टॉयलेट सुद्धा स्वच्छ करू शकता. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. लिंबाच्या सालीचा असा उपयोग करून तुम्ही पैसे वाचवू शकता. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
हेही वाचा : तुम्हाला वारंवार ॲलर्जी होते? सूर्यनमस्कार आणि प्राणायाम ठरतील फायदेशीर
व्हायरल व्हिडीओ
prajakta_salve_marathi या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “लिंबाचे साल फेकू नका नाहीतर लिंबाला राग येईल” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
एका युजरने लिहिलेय, “भारी” तर एका युजरने लिहिलेय, “साल वाळवून पण त्याचा उपयोग करता येऊ शकतो” अनेक युजर्सना हा व्हिडीओ खूप आवडला आहे.