How to reuse old pieces of soap : घरी अंघोळीचा साबण वापरताना हळू हळू तो छोटा होतो अन् शेवटी त्याचे छोटे छोटे तुकडे होतात.अशावेळी आपण असा साबण फेकून देतो. तुम्ही सुद्धा असा साबण फेकून देता का? जर हो तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक महिला साबणांच्या उरलेल्या तुकड्यांचा कसा उपयोग करायचा, याविषयी सांगताना दिसते. व्हिडीओ पाहून तु्म्हीही आश्चर्यचकीत व्हाल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय.

साबणांच्या उरलेल्या तुकड्यांचा कसा पुन्हा वापर करायचा?

Aishwarya Narkar
Video: “शेवटचे एकदा…”, ऐश्वर्या नारकर यांनी कोणासाठी शेअर केली पोस्ट?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
Viral Video of some grandmothers making reel on trending song video goes viral on social media
“आहा हा हा…यमाडी यमाडी तुईडीक रे” ट्रेंडिंग गाण्यावर आजीबाईंची जबरदस्त रील; VIDEO पाहून म्हणाल “असं आयुष्य जगा”
siddharth chandekar took special ukhana for wife mitali
“मितालीचं नाव घेतो अन् गिफ्ट करतो…”, सिद्धार्थ चांदेकरने बायकोसाठी घेतला हटके उखाणा, पाहा व्हिडीओ
amazing Ukhana for wife
“आला आला वाघ…?” कोल्हापुरच्या रांगड्या नवरदेवाचा बायकोसाठी जबरदस्त उखाणा, VIDEO एकदा पाहाच
ladies group dance on Hoti Hai Peelings Hoti Hai Feelings song video goes viral on social media
“होती है फीलिंग्स होती है फीलिंग्स” म्हणत चाळीतल्या महिलांचा तुफान डान्स; VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक
Do you let children drink tea
तुम्ही लहान मुलांना चहा प्यायला देता का? मग हा VIDEO एकदा पाहाच

या व्हायरल व्हिडीओमध्ये दाखवल्याप्रमाणे –

व्हिडीओत तुम्हाला साबणांचे उरलेले चार पाच तुकडे दिसत आहे. या तुकड्याचे छोटे छोटे तुकडे करा आणि एका पातेल्यात टाका. तुम्ही मिक्सरमधून बारीक करू शकता. त्यानंतर एक कढई घ्या. त्यात पाणी टाका आणि हे पाणी गरम करा. गरम पाण्याने भरलेल्या कढईत साबणांचे तुकडे भरलेले पातेले ठेवा. याला डबल बॉयलिंग प्रक्रिया म्हणतात. त्यानंतर साबणांच्या तुकड्यांमध्ये थोडे थोडे पाणी टाका आणि त्यानंतर तुम्हाला दिसेल की साबण पूर्णपणे वितळेल. त्यानंतर युज अँड थ्रो चा एखादा ग्लास घ्या आणि त्या ग्लासमध्ये गरम साबणाचे मिश्रण टाका. त्यानंतर हा ग्लास रुम टेम्प्रेचरमध्ये ठेवा किंवा मिश्रण थंड झाल्यावर फ्रिजमध्ये ठेवू शकता. त्यानंतर एक तासानंतर तुम्हाला दिसेल की या मिश्रणाचा एक साबण तयार झाला आहे. हा साबण पाहून कोणीही थक्क होईल साबणाच्या उरलेल्या तुकड्यांपासून चक्क महिनाभर चालेल, इतका साबण तयार झाला आहे.

हेही वाचा : शॅम्पूच्या वापरामुळे केस गळतात का? वापरताना नेमकी काय काळजी घ्याल? त्वचारोगतज्ज्ञांनी दिला सल्ला

पाहा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा : एका व्यक्तीचं रक्त वाचवू शकते तीन जणांचा जीव! रक्तदान कोणी करावे आणि कोणी करू नये? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात

Prajakta Salve या युट्यूब अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय,”साबणांचा असा वापर तुम्हाला चकीत करेल” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “साबणाची टीप खूपच छान ” तर एका युजरने लिहिलेय, “खूप छान असेच पुढे जात राहा”
प्राजक्ता साळवे या युट्यूब आणि इन्स्टाग्रामवर असेच व्हिडीओ बनवत अनेक घरगुती उपाय सांगतात. त्यांच्या प्रत्येक व्हिडीओवर यूजर्स लाइक्स आणि कमेंट्स वर्षाव करतात.

Story img Loader