Jugaad Video : सोशल मीडियावर अनेक जुगाडचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही जुगाडचे व्हिडीओ इतके क्रिएटिव्ह असतात की पाहून कोणीही थक्क होईल तर काही व्हिडीओ आश्चर्यचकीत करणारे असतात. क्रिएटिव्हीटी पाहून डोळ्यावर विश्वास बसत नाही. अनेक जुगाड आपल्या दैनंदिन जीवनात कामी येतात. सध्या असाच एक जुगाडचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये झाडूला प्लास्टिक पिशवी लावल्याचा अनोखा फायदा सांगितला आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल की झाडूला प्लास्टिक पिशवी लावल्यानंतर काय होईल? त्यासाठी तुम्हाला हा व्हिडीओ पाहावा लागेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या व्हायरल व्हिडीओमध्ये सांगितल्याप्रमाणे –

झाडूला प्लास्टिक पिशवी लावल्यानंतर तुमच्या पैशांची बचत होऊ शकते. जेव्हा झाडू जुना होतो तेव्हा झाडू प्लास्टिक होल्डरमधून निघतो. एक एक झाडूची काठी बाहेर निघते. त्यामुळे झाडताना आपल्याला त्रास होतो. मग अशावेळी आपण नवीन झाडू खरेदी करतो पण जर आपण या जुगाडचा उपयोग केला तर कदाचित आपले पैसे वाचणार.

घरी अनेक प्लास्टिक पिशव्या असतात. त्यातली एखादी प्लास्टिक पिशवी घ्या आणि प्लास्टिक होल्डरजवळ म्हणजेच झाडूच्या मध्यभागी हे प्लास्टिक नीट गुंडाळा आणि त्यानंतर त्यावर हळूवारपणे गरम इस्त्री त्या प्लास्टिकवर हलक्या हाताने लावायची ज्यामुळे प्लास्टिक पिशवी नीट चिकटणार आणि असे केल्याने तुमचा झाडू मुठीतून निघणार नाही. प्लास्टिक पिशवीचा झाडूसाठी असा वापर करून पाहा.

हेही वाचा : कोमट पाण्यात सैंधव मीठ व ‘या’ बियांची पूड घालून प्यायल्याने खूप खाऊनही वजन राहील आटोक्यात? पोट स्वच्छ करणारा उपाय वाचा

पाहा व्हायरल व्हिडीओ

prajakta_salve_marathi या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “झाडुला कॅरीबॅग घालताच चकीत व्हाल” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

हेही वाचा : सकाळी उठताच अर्धा- एक लिटर पाणी प्यायल्याने शरीरात कोणते बदल होतात? तज्ज्ञ सांगतायत, सोनाक्षी सिन्हाचं रुटीन तुम्ही फॉलो करावं का?

प्राजक्ता साळवे या त्यांच्या इन्स्टाग्राम आणि युट्युब अकाउंटवरून अनेक घरगुती उपाय सांगतात. त्यांच्या भन्नाट ट्रिक्स आणि जुगाड अनेक युजर्सना आवडतात. इन्स्टाग्राम आणि युट्युबवर त्यांचे हजारो फॉलोअर्स असून त्यांच्या व्हिडीओवर ते भरभरून प्रतिसाद देतात.

यापूर्वी त्यांचा असाच एक जुगाडचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्या व्हिडीओमध्ये त्यांनी रंगबेरंगी उरलेल्या साबणाच्या तुकड्यांचा उपयोग करून साबण बनविला होता. त्यांच्या या व्हिडीओवर लोकांनी भरपूर लाईक्स आणि कमेंट्स केल्या होत्या.