Tips to Store Biscuits And Cookies: भारतीय घरात चहा म्हणजे नुसते पेय नसून एक इमोशन मानले जाते. त्यात आता पावसाळा तोंडावर असताना चहाचे महत्त्व किती वाढते हे नव्याने सांगायला नको. अनेक तज्ज्ञ सांगतात त्याप्रमाणे चहा नुसताच पिण्यापेक्षा त्याबाबरोबर एखादे बिस्कीट खाल्ल्यास ऍसिडिटी कमी होण्यास मदत होऊ शकते. अलीकडे तर बाजारात बिस्किटांचे विविध प्रकार आले आहेत, तुम्ही सुद्धा सुपरमार्केटमधून महिन्याभराचा बिस्किटांचा स्टॉक एकदाच आणून ठेवत असाल ना? अशी स्टॉकमध्ये बिस्किटे घेताना डिस्काउंटमुळे काही रुपये वाचवता येऊ शकतात पण जर का तुम्ही ही बिस्किटे नीट स्टोअर केली नाही तर ती नरम पडून वाचवलेल्या पैशांपेक्षा अधिक नुकसान होण्याची शक्यता असते.
नरम पडलेली बिस्किटे लवकर बुरशी लागून खराब शुद्ध जपू शकतात. आज आपण बिस्किटाचा पुडा उघडल्यावर बिस्किटे नरम न पडता कशी ताजी व कुरकुरीत ठेव्याची याच्या काही सोप्या टिप्स पाहणार आहोत.
हवाबंद डब्ब्याचा करा वापर
अनेक घरांमध्ये या पद्धतीचा अवलंब केला जातो पण याची टेक्निक चुकीची असल्यासही तुमचे नुकसान होऊ शकते. तुम्ही बाजारातून बिस्किटे आणल्यावर पुडा खोलून एखाद्या हवाबंद डब्ब्यात भरून ठेवू शकता, शक्यतो पुड्यासहित बिस्किटे ठेवणे टाळावे त्यापेक्षा मोकळी करून बिस्किटे स्टोअर करू शकता. यासाठी प्लॅस्टिक किंवा काचेच्या बरण्या वापरणे कधीही उपयुक्त ठरू शकते. पण हो, इथे हे लक्षात घ्या की तुम्ही वापरणार असलेल्या भरण्याचे मटेरियल हे फूड ग्रेड असायला हवे. डब्ब्यांमुळे फार जागा अडतेय असे वाटत असेल.
हे ही वाचा<< पिवळ्या स्वीट कॉर्नऐवजी ‘या’ मक्यातून मिळू शकतो खूप फायदा? यंदा पावसाळ्यात अशी करा निवड
तांदूळ व टिश्यू
याशिवाय बिस्कीट किंवा कुकीज अधिक काळ टिकवण्यासाठी टिश्यू पेपरचा वापर सुद्धा करू शकतो. तुम्ही ज्या डब्ब्यात बिस्किटे स्टोअर करून ठेवणार आहात त्यामध्ये टिश्यू पेपरचा एक लेयर पसरवा आणि मग त्यावर बिस्किटे रचून ठेवा. वरून सुद्धा एक टिश्यू पसरवून ठेवा व मग झाकण बंद करा . तुम्ही बिस्कीट कोरडे राहावे यासाठी डब्यक्त काही तांदळाचे दाणे सुद्धा घालू शकता. या टिप्समुळे तुमची बिस्किटे अधिक काळ फ्रेश राहू शकतात व तुम्ही मेहनतीने कमावलेले व हुशारीने वाचवलेले पैसे सुद्धा वाचू शकतात.