How To Stop Earthworms In Bathroom & Basin: पावसाळा तोंडावर असताना तुमच्याकडेही स्वच्छतेला सुरुवात झाली असेल ना? तुम्ही चाळ, बिल्डिंगचा तळमजला, किंवा बंगल्यातही रहात असाल तर पावसाळ्यात घरात येणारे किडे म्हणजे डोकेदुखी वाढवू शकतात. या किड्यांमुळे तुमच्या बाथरूमचा लुक बिघडतो तर काहीवेळा या प्राण्यांच्या मार्फत अनेक आजारांचे विषाणू सुद्धा पसरत असतात, पावसाळ्यातील काही प्राणी जसे की खूप पाय असणारी गोम शरीराला चावल्यास मोठा अपाय होऊ शकतो. तुमचे त्रास व कष्ट वाचवण्यासाठी आपण आज अगदी सोपे व स्वस्त उपाय पाहणार आहोत. अवघ्या १० ते २० रुपयात तुम्हीही हे उपाय करून गांडूळ, गोम, माश्या, झुरळ यांसारख्या किड्यांपासून सुटका मिळवू शकता.
बेसिन- मोरीतून गांडूळ बाहेर येत असल्यास काय उपाय करावे?
- जाड मीठ/ खडा मीठ- बाथरूममध्ये व टॉयलेट मध्ये पांढरे जाड मीठ म्हणजेच खड्याचे मीठ पसरवून ठेवा. मीठातील क्षार या किड्यांना मारून टाकते.
- डांबर गोळ्या- बाथरूम मध्ये व घरातील नेप्थलीन बॉल म्हणजे डांबर गोळ्या पसारवून ठेवा
- कडुलिंब/ पुदिन्याची पाने- गांडूळ येतात अशा ठिकाणी पुदिन्याची किंवा कडुलिंबाची किंवा दोन्ही एकत्र अशी पाने कुस्कुरून टाका.
- कापूर- शक्य झाल्यास एक दिवस आड घरात कापूर जाळा. नारळाची धुरी केल्यास त्यात कडुलिंबाचा पाला घालावा.
- बोरिक पावडर- बाथरूम व टॉयलेट मध्ये बोरिक पावडर व ब्लिचिंग पावडर टाकून घ्या. या पावडरचा गंध खूप उग्र असतो त्यामुळे एक दिवस आड टाकू शकता.
- व्हिनेगर- प्राणी घरात येणाऱ्या ठिकाणी रात्री एक चमचा व्हिनेगर ओतावे, जेणेकरून त्या गंधाने प्राणी कमी होतील.
- बेकिंग सोडा- आपल्याला ब्लिचिंग पावडरचा उग्र गंध सहन होत नसेल तर पर्यारी आपण बेकिंग सोडा सुद्धा बाथरूमच्या फरशीवर टाकून ठेवू शकता.
हे ही वाचा<< International Yoga Day: ‘या’ तीन योगा पोजिशन प्रजनन क्षमता करू शकतात बूस्ट, पाठदुखीवर रामबाण
याशिवाय, रोज घर फिनाईलने पुसून काढण्याचा सल्ला दिला जातो, लादी पुसल्यावर कोरडी सुद्धा करा. ओल्या ठिकाणी गांडूळ, माशा अधिक येतात. जर घरात छोटे मोठे भगदाड पडले असेल तर ते वेळीच बुजवा.