गुरु हा सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह म्हणून ओळखला जातो. त्यामुळे ज्योतिष शास्त्रातही गुरु ग्रहाला खूप महत्त्व दिले जाते. तज्ज्ञांच्या मते गुरु ग्रहाचा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश होण्यासाठी सुमारे एक वर्षाचा कालावधी लागतो. देव गुरु बृहस्पती आता १२ एप्रिल २०२२ रोजी स्वतःच्या राशीत मीन राशीत प्रवेश करतील. मीन राशीत गुरूचा प्रवेश काही लोकांना अशुभ तर काहींना शुभ परिणाम देईल. या राशीच्या लोकांसाठी गुरूचे संक्रमण खूप शुभ असणार आहे. जाणून घ्या कोणत्या आहेत या ४ राशी-
वृश्चिक
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी गुरूचे संक्रमण खूप शुभ असणार आहे. या काळात तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. नवीन वर्षात तुम्हाला पैसे कमवण्याचे नवीन मार्ग सापडतील. विद्यार्थ्यांसाठी हा काळ शुभ राहणार आहे. व्यापार्यांसाठी हा काळ शुभ राहणार आहे. या काळात तुम्हाला पैसा जमा करण्यातही यश मिळेल.
( हे ही वाचा: ‘या’ ४ राशींमध्ये दडलेले आहेत श्रीमंत होण्याचे सर्व गुण, जाणून घ्या तुमच्या राशीचाही त्यात समावेश आहे का? )
धनु
गुरूचे संक्रमण धनु राशीच्या लोकांसाठीही शुभ राहणार आहे. मात्र, या काळात तुम्हाला नोकरीमध्ये आव्हानांना सामोरे जावे लागू शकते. लेखन क्षेत्राशी निगडीत लोकांसाठी हा काळ चांगला राहील. व्यापाऱ्यांना व्यवसायात भरपूर नफा मिळेल. या काळात संपत्तीत वाढ होऊ शकते.
( हे ही वाचा: नवीन वर्षात या ४ राशींवर राहील लक्ष्मीची कृपा, व्यवसाय असो किंवा नोकरी, सर्वत्र मिळेल यश )
कन्या
कन्या राशीच्या लोकांना गुरु ग्रहाच्या संक्रमणाचा फायदा होऊ शकतो. या काळात तुमची प्रतिष्ठा वाढेल. संक्रमण काळात कन्या राशीच्या लोकांना स्वतःची वेगळी ओळख निर्माण करता येईल. या काळात तुम्ही जी काही गुंतवणूक कराल, भविष्यात तुम्हाला त्याचे शुभ परिणाम मिळतील.
( हे ही वाचा: India Post Recruitment 2021: भारतीय पोस्टमध्ये १२वी उत्तीर्णांसाठी नोकरीची संधी; पगार ८१ हजारापर्यंत! )
कुंभ
कुंभ राशीच्या लोकांसाठी गुरूचे संक्रमण चांगले होणार आहे. या काळात तुमच्या उत्पन्नात वाढ होण्याची दाट शक्यता आहे. जे अनेक दिवसांपासून नोकरीच्या शोधात आहेत त्यांना हवी असलेली नोकरी मिळण्याची शक्यता आहे. कुंभ राशीच्या लोकांना या काळात वडिलोपार्जित संपत्ती मिळण्याची शक्यता आहे.