How To Get Rid Of Grey Hair Naturally: पूर्वी वयानुसार केस पांढरे होण्याची समस्या उद्भवायची. कित्येक वर्ष तर पांढरे केस हे अनुभवी व जाणत्या व्यक्तीचे प्रतीक मानले जात होते. पण अलीकडे बदलत्या जीवनशैलीनुसार अगदी लहान मुलांचे केस सुद्धा पिकायला सुरुवात झाली आहे. धावपळीत आपल्याकडून अनेकदा केसाला तेल लावणे टाळले जाते. कधी कधी तर केस नीट धुण्यासाठी सुद्धा वेळ मिळत नसल्याने फक्त कुबट वास घालवण्यासाठी केमिकल युक्त उत्पादने वापरली जातात. पण जर तुम्हाला खरोखरच सुदृढ आणि काळेभोर व दाट केस हवे असतील तर केसाला तेल लावण्यावाचून पर्याय नाही. यात आता तुमच्या फायद्याची बाब म्हणजे आम्ही काही तुम्हाला हजारो रुपये खर्च करायला लावणार नाही आहोत. उलट साध्या खोबरेल तेलाचा वापर करून तुम्ही केसाचे कसे रक्षण करू शकता हे आपण पाहणार आहोत.
तुम्हाला कलौंजीच्या काळ्या बिया माहीतच असतील. अगदी नाक्यावरच्या किराणा दुकानात सुद्धा तुम्हाला काही रुपयांमध्ये कलौंजी घेता येईल. तुम्हाला याच सहज उपलब्ध कलौंजीला (पावडर रूपात) खोबरेल तेलात मिसळून मग त्या तेलाने केसाची चंपी करायची आहे. तुम्ही बिया सुद्धा थेट तेलात मिसळू शकता पण त्यांचा अर्ज तेलात उतरण्यासाठी काही वेळ थांबावे लागू शकते.
या कलौंजीमध्ये अँटी इन्फ्लेमेंटरी गुण असतात ज्यामुळे तुमचा स्कॅल्प स्वच्छ होतो. कोंडा किंवा केसातील घाण ही मुलांना कमजोर करून केसाची वाढ खुंटवत असते अशावेळी काही सेकंदाचा मसाज तुम्हाला केसाच्या मुळांना मोकळे करण्यास मोठी मदत करू शकतो. जर तुम्हाला वेळ असेल आणि नीट केस सुटा येणार असतील तर आपण कलौंजी सह मेहेंदीची पाने सुद्धा तेलात मिसळू शकता.
हे ही वाचा<< १० रुपयात चेहऱ्यावरचे केस घरच्या घरी कसे काढाल? रेझर, किंवा वॅक्सची गरजच नाही, असा वाचवा त्रास
साधारण १० मिनिट मसाज करून तुम्ही छान केसांच्या मुळांपासून टोकापर्यंत हे तेल लावून घ्या. कमीत कमी एक तास व जास्तीत जास्त चार तास हे तेल केसांमध्ये राहूद्या पण त्यानंतर मात्र केस नीट धुवून स्वच्छ करा. थंड किंवा कोमट पाण्याचा वापर करा अति गरम पाण्यामुळे सुद्धा केसाचे नुकसान होऊ शकते. तुम्हाला ही टीप कशी वाटली ते कळवा.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित असून लोकसत्ता याबाबत कोणताही दावा करत नाही)