ज्योतिष शास्त्रानुसार टिळा लावणे एखाद्या व्यक्तीसाठी खूप शुभ मानले जाते. याउलट कोणत्याही व्यक्तीने आपल्या राशीनुसार हळद, चंदन, भस्म, कुंकुम इत्यादींचा तिलक लावल्यास त्या व्यक्तीच्या जीवनात अधिक शुभ प्रभाव जाणवतो. असे केल्याने त्या राशीचा स्वामी ग्रह अधिक सामर्थ्यवान होऊन व्यक्तीच्या कुंडलीत सुख आणि ऐश्वर्य प्रदान करतो आणि प्रत्येक क्षेत्रात त्याची प्रगती सुरू होते.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
- मेष राशीच्या लोकांनी लाल चंदन किंवा कुमकुमचा तिलक लावावा. तुमच्या राशीचा स्वामी मंगळ आहे. हे लाल रंगाशी संबंधित आहे. या रंगाचे तिलक लावल्याने सर्व कामात यश मिळते.
- वृषभ राशीचा स्वामी शुक्र आहे. या राशीच्या लोकांनी पांढर्या चंदनाचा तिलक लावावा, कारण शुक्र शुभ्र रंगाशी संबंधित आहे
- मिथुन राशीच्या लोकांसाठी अष्टगंधाचा तिलक लावणे शुभ आहे. या राशीचा स्वामी बुध ग्रह आहे.
- कर्क राशीच्या लोकांवर चंद्र ग्रहाची दृष्टी असते. अशा स्थितीत या राशीच्या लोकांनी पांढर्या चंदनाचा तिलक लावावा.
- सिंह राशीचा सूर्य बलवान आहे. लाल रंगाचा तिलक लावणे शुभ असतं.
- कन्या राशीच्या लोकांनी कपाळावर रक्तचंदनाचा तिलक लावावा. त्याने आर्थिक समृद्धी येते.
- तूळ राशीचा अधिपती शुक्र आहे. या राशीच्या लोकांनी पांढर्या चंदनाचा तिलक लावावा, कारण शुक्र शुभ्र रंगाशी संबंधित आहे.
- वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ ग्रह आहे. या राशीच्या लोकांनी लाल सिंदूर तिलक लावावा.
- धनु या राशीचा स्वामी गुरू आहे. पिवळे चंदन किंवा हळदीचा तिलक लावावा.
- मकर राशीचा स्वामी ग्रह शनि आहे. या राशीच्या लोकांसाठी भस्म किंवा काळ्या रंगाचा तिलक लावणे शुभ असते.
- कुंभ राशीच्या लोकांनी हवनाच्या भस्माचा तिलक लावावा. आर्थिक संकटातून सुटका मिळते.
- मीन राशीचा अधिपती ग्रह मीन आहे. या राशीच्या लोकांनी पिवळ्या रंगाचा तिलक लावावा.
First published on: 09-12-2021 at 09:17 IST
मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jyotish shastra tila on the forehead gives auspicious signs rmt